भारतात प्रतिजैविक गोळ्यांचा जास्त वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:03 AM2017-10-05T02:03:42+5:302017-10-05T02:03:59+5:30
अॅन्टिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रकारे आणि कमी प्रमाणात होण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी
अलिबाग : अॅन्टिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविकांचा वापर योग्य प्रकारे आणि कमी प्रमाणात होण्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता जागतिक आरोग्य संघटना १६ ते २२ नोव्हेंबर हा आठवडा ‘जागतिक प्रतिजैविके जागरूकता आठवडा’ म्हणून साजरा करते. तर भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटना २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत याबाबत प्रतिवर्षी जागरूकता उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा ‘प्रतिजैविकांच्या वापरास आळा घालणे’ विषयावरील डॉक्टरांच्या परिषदेत विचारमंथन करून संपूर्ण जिल्ह्यात याबाबत बालरोग तज्ज्ञ परिषदेच्या सदस्य डॉक्टरांनी जागरूकता उपक्रम आयोजित केल्याची माहिती भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या अलिबाग शाखेचे प्रमुख डॉ.राजेंद्र चांदोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली
आहे.
एफडीएने संमती दर्शवलेल्या प्रतिजैविकांचे अयोग्य संयोजन व त्यांचा प्रचार करणारे वैद्यकीय प्रतिनिधी हेही या प्रतिरोधकतेस काही प्रमाणात कारणीभूत ठरतात. जगामध्ये प्रतिजैविकांचा सर्वात जास्त वापर भारतात होत असल्याचे दिसून आले आहे. २००० ते २०१० या काळात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून प्राप्त निष्कर्षानुसार प्रतिजैविकांच्या अमेरिकेत ६.८ अब्ज गोळ््यांची, चीनमध्ये १० अब्ज गोळ््यांची तर भारतात सर्वाधिक १२.९ अब्ज गोळ््यांची विक्री झाल्याचे आढळून आले आहे. यावरून भारतात प्रतिजैविकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट होत असल्याने भारतात जागरूकतेचे प्रयत्न प्रभावी करणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांच्या या परिषदेत व्यक्त करण्यात आले.
रायगड जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरालक्ष्मी सभागृहात झालेल्या डॉक्टरांच्या या परिषदेत रायगड जिल्हा बालरोग तज्ज्ञ संघटनेचे जागतिक प्रतिजैविके जागरूकता आठवडा संयोजक प्रमुख डॉ.राजेंद्र चांदोरकर, डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, डॉ.राजीव धामणकर, डॉ.महेश मोहिते, डॉ.हेमंत गंगोलिया, डॉ.परवेझ शेख, डॉ.आदित्य चेवले, डॉ.वैभव देशमुख, डॉ.प्रमोद वानखेडे हे सहभागी झाले होते तर रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विषाणूंच्या जंतू संसर्गामध्ये प्रतिजैविकांचा मोठ्या प्रमाणात वापर
जागतिक स्तरावर जंतुनाशक औषधांच्या वापरात भारत केंद्रबिंदू आहे. भारत ही एक मोठी औषध वसाहत असल्याने जंतुसंसर्गामुळे होणाºया आजारांचे वाढते प्रमाण, प्रतिरोधक जीवाणूंचे वेगाने वाढणारे प्रमाण, विषाणूंच्या जंतू संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी प्रतिजैविके आदी विषयांवर या परिषदेत प्रेझेंटेशनसह विचारमंथन करण्यात आले.