शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मृतदेहाची अदलाबदली अधिकाऱ्यांना भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 12:09 AM

आयुक्तांनी बजावली नोटीस : चौकशी अहवालातून हलगर्जी उघड

नवी मुंबई : रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल होऊन मुस्लीम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार झाल्याचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये घटनेला कारणीभूत बाबींचा उलगडा झाल्याने संबंधितांवर कारवाईचे संकेत देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

वाशी येथील पालिका रुग्णालयाच्या शवागारातून हा प्रकार घडला होता. दिघा येथील काजल सूर्यवंशी व उलवे येथील उमर शेख यांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. दोघांचाही मृत्यू कोरोनासदृश आजाराने झाल्याने चाचणीसाठी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु १५ मे रोजी दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना कळवले होते. कालजला मृतदेह तिच्या वडिलांनी ताब्यात घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार केले. तर चार दिवसांनी उमर शेखचे नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यासाठी आले असता मृतदेह सापडला नाही. उमर एकटाच उलवे येथे राहायला होता. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पश्चिम बंगाल येथून त्याचे नातेवाईक आले होते. परंतु शवागारात उमरचा मृतदेह सापडत नसल्याने खळबळ उडाली. अखेर दोन दिवसांनी मृतदेहाची अदलाबदल होऊन काजलच्या ऐवजी उमरचा मृतदेह देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे उमरच्या नातेवाइकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली असता, पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांनी घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रुग्णालयातील तिघा अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झालेला आहे. तशी मागणी उमरच्या नातेवाइकांनी लावून धरली होती. त्यामुळे संबंधितांनी पालिका आयुक्तांना दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांना प्रशासकीय कारवाईसह पोलिसांच्यादेखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

‘तो’ व्हिडीओ ठरला महत्त्वाचाच्मृतदेह गहाळ झाल्यानंतर शोधाशोध सुरू असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काजल व उमर यांचे मृतदेह शवागारात एकाच पेटीत ठेवत असताना संबंधिताने माहितीस्तव हा व्हिडीओ काढला होता.च्तो व्हिडीओ समोर आल्यानंतर शवागारात निष्काळजीपणाच्या अनेक बाबी समोर आल्या. तसेच शवागारात १८ पेट्या असताना त्या ठिकाणी ३२ मृतदेह ठेवल्याचीही बाब समोर आली.१रुग्णालयाच्या शवागारात पालिका हद्दीबाहेरील मृतदेह न ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यानंतरही उलवेत राहणारा उमर शेख याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. तर शवागारात जागा अपुरी असल्याने काजल व उमर यांचे मृतदेह एकाच रॅकमध्ये ठेवले होते.२त्या वेळी काजलच्या मृतदेहाची ओळख पटवणारे लेबलही आढळले नाही. त्यामुळेच मृतदेहाची अदलाबदल होऊन गंभीर घटना घडल्याचा ठपका पालिका आयुक्तांनी लावला आहे. यामुळे शवागार प्रशासन व दोन डॉक्टरांना शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका