उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात
By राजेश भोस्तेकर | Published: June 15, 2024 09:59 PM2024-06-15T21:59:23+5:302024-06-15T21:59:23+5:30
उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.
अलिबाग : राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे १२ जून रोजी १ कोटी रूपये किमंतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. तपासिक अधिकारी रायगडचे उत्पादन शुल्क अधिकारी रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असताना पुन्हा तपासात दोन आरोपींना अटक करून वाहनासह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली. आरोपींना कार्यालयात चौकशीकामी आणले असता आरोपी परवेझ शेख याचे मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुध्दा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तु सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर ये असे सांगितले.
उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला. माल घेऊन आलेले हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे या आरोपींना ईनोव्हा कार सह १३५ किलो गांजासह ४५ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे गांजा सारख्या अंमली पदार्थाचे रॅकेट हे मोठ्या प्रमाणात असल्याचे या कारवाईने समोर आले आहे.
डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त सो., राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक, उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक, गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे सखाराम पवार हे सहभागी होते.
सदरील गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.