युवा शक्तीला वळवण्यासाठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:09 AM2019-04-13T01:09:47+5:302019-04-13T01:09:55+5:30
उमेदवारांना घ्यावी लागणार मेहनत : पेण विधानसभा मतदारसंघात १ लाख ३० हजार ८१० युवा मतदार
पेण : रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, तो म्हणजे १९१ पेण विधानसभा मतदारसंघ होय. पेण मतदारसंघात युवा मतदारांची आकडेवारी १ लाख ३० हजार ८१० एवढी असून या युवा शक्तीचे प्रत्येक निवडणुकीत १०० टक्के मतदान होते. त्यामुळे युती व आघाड्यांच्या उमेदवारांना आपल्या बाजूस हे मतदान वळवण्यासाठी येत्या ११ दिवसात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. या मतदारांचा टक्का जिकडे झुकेल तो उमेदवार पेण विधानसभा मतदारसंघात निश्चितच विजयी होईल असे एकंदर निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील चित्र दिसते.
पेण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ७६ हजार एकूण मतदार असून यामध्ये १ लाख ५१ हजार ४२१ पुरुष मतदार तर १ लाख ४८ हजार ६५५ महिला मतदारांची संख्या आहे. पेण विधानसभा मतदारसंघात ३७५ मतदान केंद्र असून यामध्ये पेण तालुक्यात २०८ केंद्र, पाली-सुधागडमध्ये ८० केंद्र, तर रोहा तालुक्यात ८७ केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमधील वयोगटानुसार १८ ते १९ वर्ष या नव्याने मतदार नोंदणी झालेल्याची संख्या ६ हजार १३ इतकी आहे.
२० ते २९ वर्षे या वयोगटात ५९ हजार ६०३ इतके मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटात ६५ हजार १९४ मतदार आहेत. ४० ते ४९ या वयोगटात ५९ हजार ५७७ मतदार आहेत. ५० ते ५९वयोगटात १८ हजार ४८७ मतदार आहेत. ८० ते ८९ या वयोगटात ८ हजार ७८७ मतदार आहेत. ९० जे ९९ या वयोगटात १ हजार ९५९ मतदार आहेत. तर १०० वर्गपार केलेले २५० मतदार आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. अशी वयोगटानुसार मतदारांची संख्या आहे. मतदार संघात निवडणुकीतील राजकीय प्रचारादरम्यान रोजगार व शेतीसंबंधी प्रमुख मुद्दे प्रचारात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगाराशी संबंधित असलेले बेरोजगार युवा मतदारांची संख्या १ लाख ३० हजार ८१० मतदार संख्येत मतदारांना इतर प्रश्नांपेक्षा रोजगाराची जास्त अपेक्षा आहे.
प्रौढ मतदार वयोगटातील ४० ते ५९ मधील १ लाख ७ हजार ७८८ मतदार संख्या असलेला मतदार हा शेतकरी वर्गात मोडतो. शेती व शेतकऱ्यांसंबंधी आश्वासक पूरक योजना राबविण्यास कोणतेही सरकार यशस्वी न ठरल्याने शेतकरी वर्गाचा भ्रमनिरास झालेला आहे. या वयोगटातील मालाला योग्य हमीभाव न दिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. या वयोगटातील मतदारही निवडणुकीत कोणतेही भूमिका घेऊन मतदान करेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उरलेला ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटातील मतदारांमध्ये ६१ हजार ९७८ मतदार असून यातील निवृत्त झालेल्या सरकारी नोकरदार, वयोवृध्द शेतकरी व समाज घटकांतील इतर वयोवृध्द मतदार यांचे होणारे मतदान दुसºया व्यक्तींच्या सहकार्य अथवा मदतीशिवाय होत नसते. त्यामुळे या वयोगटातील होणाºया मतदारांची टक्केवारी नेहमीच कमी ठरते.
एकूण मतदारांपैकी महिला मतदारांचे प्रमाण ४८ टक्के आहे. महिला वर्ग हा नेहमी प्रामाणिक व कसोसीने मतदान करतो. परंतु रोजगार हमी योजना व इतर शेतीसंबंधी कामात रोजगाराची उणीव असल्याने महिलांचे मतदान जिकडे पडेल तो उमेदवार भाग्यवान ठरणार आहे.
प्रशासनाची निवडणुकीसाठी तयारी
च्प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून मतदारांची ओळख पत्रे, मतदार याद्या, मतदान केंद्रावरील पाहणी दौरे, निवडणूक दक्षता पथकांची पेट्रोलिंग या शिवाय निवडणुकीसंबंधी मतदार जनजागृती मोहिमेमध्ये पथनाट्य चौक सभा, चावडीवर सभा इत्यादीद्वारे गावागावात मोहीम राबविली आहे.
मतदान प्रचारासाठी व्हीव्हीपॅट मशिन, प्रात्यक्षिकांद्वारे मतदान करण्याची जनजागृती मोहीम राबवणे, दिव्यांग मतदारांची जनजागृती त्यांना लागणाºया मतदान केंद्रावरील साधनसुविधा इत्यादीची जमवाजमव केलेली आहे.
च्मतदान शांततेने पार पाडावे यासाठी शांतता कमिटीच्या बैठका इत्यादीद्वारे पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाद त्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्ग, यांनी २३ एप्रिल रोजी होणाºया मतदानाची जय्यत तयारी सुरु केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान अधिकाºयांसह चार कर्मचारी व पोलीस यंत्रणेचा बंदोबस्त आहे.