शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

युवा शक्तीला वळवण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 1:09 AM

उमेदवारांना घ्यावी लागणार मेहनत : पेण विधानसभा मतदारसंघात १ लाख ३० हजार ८१० युवा मतदार

पेण : रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, तो म्हणजे १९१ पेण विधानसभा मतदारसंघ होय. पेण मतदारसंघात युवा मतदारांची आकडेवारी १ लाख ३० हजार ८१० एवढी असून या युवा शक्तीचे प्रत्येक निवडणुकीत १०० टक्के मतदान होते. त्यामुळे युती व आघाड्यांच्या उमेदवारांना आपल्या बाजूस हे मतदान वळवण्यासाठी येत्या ११ दिवसात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. या मतदारांचा टक्का जिकडे झुकेल तो उमेदवार पेण विधानसभा मतदारसंघात निश्चितच विजयी होईल असे एकंदर निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील चित्र दिसते.

पेण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ७६ हजार एकूण मतदार असून यामध्ये १ लाख ५१ हजार ४२१ पुरुष मतदार तर १ लाख ४८ हजार ६५५ महिला मतदारांची संख्या आहे. पेण विधानसभा मतदारसंघात ३७५ मतदान केंद्र असून यामध्ये पेण तालुक्यात २०८ केंद्र, पाली-सुधागडमध्ये ८० केंद्र, तर रोहा तालुक्यात ८७ केंद्रांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमधील वयोगटानुसार १८ ते १९ वर्ष या नव्याने मतदार नोंदणी झालेल्याची संख्या ६ हजार १३ इतकी आहे.

२० ते २९ वर्षे या वयोगटात ५९ हजार ६०३ इतके मतदार आहेत. ३० ते ३९ वयोगटात ६५ हजार १९४ मतदार आहेत. ४० ते ४९ या वयोगटात ५९ हजार ५७७ मतदार आहेत. ५० ते ५९वयोगटात १८ हजार ४८७ मतदार आहेत. ८० ते ८९ या वयोगटात ८ हजार ७८७ मतदार आहेत. ९० जे ९९ या वयोगटात १ हजार ९५९ मतदार आहेत. तर १०० वर्गपार केलेले २५० मतदार आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. अशी वयोगटानुसार मतदारांची संख्या आहे. मतदार संघात निवडणुकीतील राजकीय प्रचारादरम्यान रोजगार व शेतीसंबंधी प्रमुख मुद्दे प्रचारात आलेले नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगाराशी संबंधित असलेले बेरोजगार युवा मतदारांची संख्या १ लाख ३० हजार ८१० मतदार संख्येत मतदारांना इतर प्रश्नांपेक्षा रोजगाराची जास्त अपेक्षा आहे.

प्रौढ मतदार वयोगटातील ४० ते ५९ मधील १ लाख ७ हजार ७८८ मतदार संख्या असलेला मतदार हा शेतकरी वर्गात मोडतो. शेती व शेतकऱ्यांसंबंधी आश्वासक पूरक योजना राबविण्यास कोणतेही सरकार यशस्वी न ठरल्याने शेतकरी वर्गाचा भ्रमनिरास झालेला आहे. या वयोगटातील मालाला योग्य हमीभाव न दिल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. या वयोगटातील मतदारही निवडणुकीत कोणतेही भूमिका घेऊन मतदान करेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उरलेला ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटातील मतदारांमध्ये ६१ हजार ९७८ मतदार असून यातील निवृत्त झालेल्या सरकारी नोकरदार, वयोवृध्द शेतकरी व समाज घटकांतील इतर वयोवृध्द मतदार यांचे होणारे मतदान दुसºया व्यक्तींच्या सहकार्य अथवा मदतीशिवाय होत नसते. त्यामुळे या वयोगटातील होणाºया मतदारांची टक्केवारी नेहमीच कमी ठरते.

एकूण मतदारांपैकी महिला मतदारांचे प्रमाण ४८ टक्के आहे. महिला वर्ग हा नेहमी प्रामाणिक व कसोसीने मतदान करतो. परंतु रोजगार हमी योजना व इतर शेतीसंबंधी कामात रोजगाराची उणीव असल्याने महिलांचे मतदान जिकडे पडेल तो उमेदवार भाग्यवान ठरणार आहे.प्रशासनाची निवडणुकीसाठी तयारीच्प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून मतदारांची ओळख पत्रे, मतदार याद्या, मतदान केंद्रावरील पाहणी दौरे, निवडणूक दक्षता पथकांची पेट्रोलिंग या शिवाय निवडणुकीसंबंधी मतदार जनजागृती मोहिमेमध्ये पथनाट्य चौक सभा, चावडीवर सभा इत्यादीद्वारे गावागावात मोहीम राबविली आहे.मतदान प्रचारासाठी व्हीव्हीपॅट मशिन, प्रात्यक्षिकांद्वारे मतदान करण्याची जनजागृती मोहीम राबवणे, दिव्यांग मतदारांची जनजागृती त्यांना लागणाºया मतदान केंद्रावरील साधनसुविधा इत्यादीची जमवाजमव केलेली आहे.च्मतदान शांततेने पार पाडावे यासाठी शांतता कमिटीच्या बैठका इत्यादीद्वारे पेण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकारी प्रतिमा पुदलवाद त्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी वर्ग, यांनी २३ एप्रिल रोजी होणाºया मतदानाची जय्यत तयारी सुरु केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान अधिकाºयांसह चार कर्मचारी व पोलीस यंत्रणेचा बंदोबस्त आहे.

टॅग्स :raigad-pcरायगड