शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:55 AM

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेकडील राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेकडील राष्ट्रीय पेयजल योजनेतील नवनवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आखण्यात आलेल्या कोट्यवधी रु पयांच्या योजना ठेकेदार कंपनीच्या घशात संगनमताने घातल्या जात असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी प्रशासन आणि सरकारने तातडीने कारवाई करून जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळावा, अशी मागणी जोर धरीत आहे.तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत तीनवीरा वाढीव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे जलशुध्दीकरण केंद्र, फिल्टर प्लँट यासारखी प्रमुख कामे अपूर्ण असताना ठेकेदार कंपनीला जवळपास सुमारे पावणेतीन कोटी रुपये बिल अदा केल्याचे समोर आले आहे.ग्राम शिखर समिती तीनवीरा तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व जबाबदार अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडे लेखी पत्र पाठवून केली आहे. याआधीही उमटे पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी मांडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता तीनवीरा धरणाबाबतचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सावळागोंधळ असल्याचे अधोरेखित होते.तीनवीरा वाढीव पाणीपुरवठा योजनेचे टेंडर शिखर समितीने २६ नोव्हेंबर २0१३ रोजी उघडून ते आमदार सुभाष पाटील यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला मंजूर केले. ही बाब सावंत यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार उघड केली.योजनेतील अटी शर्तीनुसार ठेकेदाराला कोणतेही अ‍ॅडव्हान्स देय नसल्याने सनदी लेखापाल यांनी या गोष्टीस हरकत घेतल्याची बाबही माहिती अधिकारात समोर आली आहे. या योजनेस जिल्हा परिषदेने १ आॅक्टोबर २०१३ ला प्रशासकीय मान्यता दिली. त्यापूर्वीच म्हणजे योजना मंजूर होण्यापूर्वीच ग्राम शिखर समिती तीनवीरा यांनी या योजनेसाठीची लोकवर्गणी ४० लाख रु पये बँकेत कसे जमा केले हा मोठा प्रश्न आहे. या योजनेसाठी ५ जुलै २०१४ पर्यंत २ कोटी ६६ लाख ९६३ रुपये सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत. कामे न करता ठेकेदार कंपनीला जवळजवळ पूर्ण बिल अदा केल्याचे लक्षात आल्यावर सावंत यांनी तीनवीरा धरणाला १९ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तेथे योजनेमध्ये नमूद जलशुध्दीकण केंद्र व फिल्टर प्लँट ज्यासाठी सुमारे एककोटी रुपये सुप्रभात इन्फ्राझोन या ठेकेदार कंपनीला अदा करण्यातआले आहेत ती कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. ती सर्व छायाचित्रे केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाकडे पाठविली असल्याचे सावंत यांनी सांगितले.योजनेतील जलशुध्दीकण केंद्र व फिल्टर प्लँटसारखी मूळ कामेच झाली नाहीत, असे असताना ही योजना पूर्ण झाली असल्याची खोटी नोंद केंद्र शासनाच्या वेबसाईटवर टाकणाºया जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व उप अभियंता पाणीपुरवठा यांच्याविरुध्द शासन नियमानुसार फौजदारी प्रक्रि या सुरू करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.दरम्यान, या योजनेबाबत तक्र ार करण्यात आली आहे. योजनेमध्ये काही अनियमितता आढळल्यास ते पडताळून पाहिले जाईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भस्मे यांनी सांगितले.>पहिला हप्ता ८५ लाख १९ हजारपेयजल योजनेसाठी लोकवर्गणी म्हणून ४० लाख रुपये ग्रामसमितीच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यात ८ एप्रिल २०१३ रोजी रोखीने भरण्यात आले.योजनेचा पहिला हप्ता ८५ लाख १९ हजार ९९५ रु पये २८/१०/२०१३ रोजी जमा झाल्यावर २/१२/२०१३ रोजी तेच ४० लाख रुपये या खात्यातून काढण्यात आल्याचे उघड झाले आहे.पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळउमटे पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी मांडले होते.यामध्ये ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. ते प्रकरण ताजे असतानाच आता तीनवीरा धरणाबाबतचा प्रश्न पुढे आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये सावळागोंधळ असल्याचे अधोरेखित होते.