पेण : पेण-पनवेल या मध्य रेल्वेच्या मेमू प्रवासी शटलसेवा गाडीला पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि अनेक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित शटल सेवेला अखेर मुहूर्त मिळाला. या मागणीसाठी रेल्वे विकास संघर्ष समिती, मी पेणकर आम्ही पेणकर विकास समन्वय समिती, रेल्वे प्रवासी संघ, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, शेकापने पाठपुरावा केला होता.
रविवार पेण ते पनवेल मार्गावर डिझेलऐवजी लोकल आणि मेलच्या डब्यांचा संयोग साधलेला मेमू डब्यांची सेवा सुरू झाली आहे. सेवेचा उद्घाटन सोहळा खारकोपर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केला.पेण-पनवेल मार्गाचे विद्युतीकरण होऊन या मार्गावर ओव्हरलोड वायरचे सुमारे २००० खांब, पुलांचे २३ सांगाडे, १०० पेक्षा जास्त मल्टी ट्रॅक पोर्टल, एक बोगदा, अशा ३२ कि.मी. मार्गावर रविवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मेमू १२ डब्यांची गाडी प्रवाशांना घेऊन निघाली.रोजगाराच्या संधीच्पेण ते पनवेल मार्गावर डिझेलऐवजी लोकल आणि मेलच्या डब्यांचा संयोग साधलेला मेमू डब्यांची सेवा सुरू झाली आहे. या प्रवासी शटल सेवेमुळे मुंबई-ठाणे, नवी मुंबई ते वसई विरारपर्यंत पेण जोडले गेल्यास रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.