लोकांचे प्रश्न सोडवूनच शेकापचा विस्तार- पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:24 AM2017-08-13T03:24:31+5:302017-08-13T03:24:31+5:30
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटात्मक काम करावे. आपापसातील मतभेद न ठेवता पक्षाच्या वृद्धी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका चिटणीस पद हे केवळ
मुरुड : शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटात्मक काम करावे. आपापसातील मतभेद न ठेवता पक्षाच्या वृद्धी व उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुका चिटणीस पद हे केवळ बिल्ला लावण्यापुरते मर्यादित नसावे. रायगड जिल्ह्यात पक्ष बळकट करावयाचा असेल, तर शेकाप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये मिसळावे, त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी दिला.
मुरुड शहरातील माळी समाजगृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, रायगड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अनंतराव देशमुख, खजिनदार राजेंद्र पाटील, अॅडव्होकेट सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरु ड तालुक्यातील उसरोळी जिल्हा परिषद जागाही दोन वेळा गमावली गेली आहे. त्यामुळे निश्चितच याचे शल्य आहे; परंतु पुढील निवडणुकीत ही जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, अशा सूचना या वेळी आस्वाद पाटील यांनी उपस्थितांना केल्या.