अन्वय यांनी गळफास घेतल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:31 AM2018-05-08T05:31:19+5:302018-05-08T05:31:19+5:30

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

 Explain that Anwy took the blame | अन्वय यांनी गळफास घेतल्याचे उघड

अन्वय यांनी गळफास घेतल्याचे उघड

Next

अलिबाग : मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरीअर डिझायनर अन्वय नाईक यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचा शवविच्छदेन अहवाल यायला उशीर लागणार असल्याची माहिती अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली. त्यांचा विसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर त्यांच्या मुत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्वय नाईक यांनी ५ मे रोजी अलिबाग येथील फार्म हाउसवर आत्महत्या केली होती. त्या वेळी त्यांच्या आई कुमूद यांचाही मृतदेह तेथेच आढळला होता. अन्वय यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांना जबाबदार धरले होते. प्राथमिक तपासामध्ये या तिघांकडून अन्वय यांना सुमारे सहा कोटी रुपये येणे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात आणखी कागदपत्रांची तपासणी करून रक्कम अधिक होती का याचा तपास केला जात असल्याचेही वराडे यांनी सांगितले.

Web Title:  Explain that Anwy took the blame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.