पोशीर नदीत जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:39 PM2018-10-29T23:39:51+5:302018-10-29T23:40:15+5:30

महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Exploration of the sand along the JCB in the river Posheer | पोशीर नदीत जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खनन

पोशीर नदीत जेसीबीच्या साहाय्याने रेती उत्खनन

googlenewsNext

नेरळ : कर्जत तालुक्यात नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन सुरू आहे. जेसीबी, ट्रॅक्टर लावून रेती उपसा केला जात आहे. या रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने नदीपात्रांची दुरवस्था झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पोशीर नदीतही पोशीर- चिकनपाडा, पोही, कळंब भागात भरदिवसा जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरच्या साहाय्याने नद्यांमध्ये उत्खनन सुरू आहे. परंतु रेती उत्खनन करणाºयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नियम धाब्यावर बसवून रेती उत्खनन होत असून पर्यावरणाची हानी होत आहे. यासाठी नियमही धाब्यावर बसवले जात आहेत.

गाव पातळीवर काम करणारे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून अवैध रेती उत्खनन करणाºयांवर कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस उत्खनन वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर या रेती उत्खनन करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Exploration of the sand along the JCB in the river Posheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.