पैशासाठी तगादा, छळ; तिने स्वत:लाच संपवले, पती अटकेत, सासू मात्र फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 12:44 IST2023-09-14T12:43:53+5:302023-09-14T12:44:06+5:30
Raigad: घरगुती कारणावरून घालून-पाडून बोलणे, माहेरहून पैसे आणण्यास सांगून शिवीगाळ करणे तसेच मारून टाकण्याची धमकी या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून येथील एका विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पैशासाठी तगादा, छळ; तिने स्वत:लाच संपवले, पती अटकेत, सासू मात्र फरार
वडखळ : घरगुती कारणावरून घालून-पाडून बोलणे, माहेरहून पैसे आणण्यास सांगून शिवीगाळ करणे तसेच मारून टाकण्याची धमकी या मानसिक व शारीरिक छळास कंटाळून येथील एका विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपी पती विनायक चंद्रकांत ठाकूर (वय ३० वर्षे) यास वडखळ पोलिसांनी अटक केली आहे, तर आरोपी सासू प्रतीभा चंद्रकांत ठाकूर (वय ५२ वर्ष) ही फरार आहे.
प्रणाली विनायक ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत ओंकार केशव वर्तक याने वडखळ पोलिस ठाणे येथे फिर्यादी दिली आहे. प्रणालीने सासरच्या छळाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत.