शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

जिल्ह्यात सर्वत्र सप्तरंगांची उधळण

By admin | Published: March 14, 2017 2:18 AM

जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये

अलिबाग : जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये चांगलेच न्हाऊन निघाल्याने जणू इंद्रधनुष्य समुद्रकिनारी अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठा, भाजी मंडई काही अंशी बंद असल्याने चौकाचौकामध्ये ढोल-ताशांच्या गजरात रंगोत्सव साजरा करण्यात आला.शिमगोत्सव म्हणजेच होळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धुळवड साजरी केली जाते. सकाळपासूनच रस्त्यांवर तरुणाईचा घोळका एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करीत होते. काहींनी चौकाचौकांमध्ये डीजे लावला होता, तर काही ठिकाणी बँजो, ढोल- ताशाच्या गजरावर ठेका धरला होता. सप्तरंगांच्या रंगात तरुणाई मंत्रमुग्ध झाली होती.तोंड रंगविलेल्या बाइकस्वारांसह चारचाकी वाहनातून जथ्थेच्या जथ्थे रस्त्यांवरून फिरत होते. चौकाचौकात रंगोत्सव साजरा केल्यावर समुद्र किनाऱ्याकडे गर्दी सरकत होती. समुद्र स्नानाचा आनंद घेताना तेथे काही पर्यटकही तरुणाईच्या रंगात रंगून जात असल्याचे दिसून आले. समुद्र किनारी मोठ्या संख्येने स्थानिकांसह पर्यटक दाखल झाल्याने तेथे जत्रेचे स्वरूप आले होते. तरुणींसह महिलांनीही रंगोत्सव साजरा केला. मुलांच्या ग्रुपप्रमाणेच तरुणी आणि महिलांचेही ग्रुप रस्त्यावर धुळवड साजरी करताना ठिकठिकाणी दिसत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत उत्सव साजरा करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)कर्जत : तालुक्यात ३७९ होळ्या पेटविण्यात आल्या असून धूलिवंदन शांततेत साजरे करण्यात आले. पाणी वाचविण्यासाठी बहुतांश ठिकाणी कोरडेच धूलिवंदन पाहायला मिळाले. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ४५ व सार्वजनिक १४६, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ४० व सार्वजनिक १३५, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी ३ व सार्वजनिक १० अशा एकूण ३७९ होळ्या पेटविण्यात आल्या. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी कर्जत शहरात सकाळऐवजी दुपारी पाणीपुरवठा करण्यात आला होता. गावागावातील लहान मुलांनी दहा दिवस आधीच होळीची पिल्ले पेटवून होलिकोत्सव जवळ आल्याची चाहूल दिली होती. दोन- तीन दिवस आधी सुकलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करण्यात आल्या. होळीच्या दिवशी सावरीचे झाड मधोमध उभे करून त्याभोवती लाकडे, झाडांच्या फांद्या, पेंढ्या टाकून होळी रचण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी होळीची पूजा करून रात्री होलिका दहन करण्यात आले. धुळवडीच्या दिवशी लहानग्यांनी रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. रस्त्यावरील वाहनांना अडवून होळीचे पोस्त जमा करण्यासाठी बालगोपाळांबरोबरच तरुणही पुढाकार घेत होते.मुरु ड समुद्रकिनारी हजारो पर्यटकच्आगरदांडा : कोकणात लोकप्र्रिय असलेला होलिकोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी केळी, साखर, आंबा, नारळ, सुपारीच्या फांद्यांचे पूजन करण्यात आले. जवळच्या वाडीत जाऊन होळी आणून ती सजविणे यात बच्चे कंपनीने पुढाकार घेतला होता. प्रत्येक गावाच्या, प्रथेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. राग, द्वेष, मत्सर होळीत जाळून टाकावा हा या उत्सवातील एक हेतू मानला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्यात आली. च्सोमवारी सकाळपासूनच रस्ते, नाके गजबजले होते. वाहनाची रेलचेलही तुरळक होती. प्रत्येकाच्या हातात रंग, गुलाल, पिचकाऱ्या दिसत होत्या. उत्तर भारतीय समाजाकडून मुरु ड समुद्राजवळ होळी मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मुरु ड शहरातील नगरसेवक प्रमोद भायदे, नगरसेवक अशोक धुमाळ व मान्यवर तसेच पर्यटकांनी हजेरी लावली व नृत्याचा ठेका घेतला.उरण परिसरात होलिकोत्सव, धुळवड उत्साहातउरण : उरण परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच होलिकोत्सवाची धूम सुरू होती. होळी पूजनानंतर मध्यरात्री ठिकठिकाणी पारंपरिक हाकाटी देत नागरिकांनी होळी साजरी केली. सोमवारी उरण परिसरात धुळवडही नागरिकांनी अनेक रंगांची उधळण करीत साजरी केली. धुळवडीनंतर हजारो नागरिकांनी पीरवाडी, माणकेश्वर, दांडा समुद्र किनाऱ्यावर पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. पीरवाडी, माणकेश्वर, दांडा येथील बीचवरील गर्दीमुळे समुद्रकिनारेही फुलून गेले होते.