कर्करोगग्रस्तांची व्यथा मांडण्यात अयशस्वी
By admin | Published: September 26, 2015 01:10 AM2015-09-26T01:10:15+5:302015-09-26T01:10:15+5:30
कर्करोग पीडितांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांनी कट्टी बट्टीला नाकारले. हिंदी सिनेमात ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल.
कर्करोग पीडितांच्या भूमिका असलेल्या चित्रपटांना पसंती देणाऱ्या प्रेक्षकांनी कट्टी बट्टीला नाकारले. हिंदी सिनेमात ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या निखिल आडवाणी यांच्या कट्टी बट्टी या चित्रपटाची ही गोष्ट असून ज्यामध्ये कंगनाने कर्करोग पीडित तरुणीची भूमिका केली आहे आणि तिच्या सारख्या अव्वल दर्जाची अभिनेत्रीदेखील या चित्रपटाला बॉक्स आॅफीसवर वाचवू शकली नाही.
इतिहास पाहिल्यास अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंत केले ज्यामध्ये मुख्य भूमिका असलेला कर्कारोगाने पीडित आहे. राजकुमार, मीना कुमारी, राजेंद्र कुमार यांचा ‘दिल एक मंदिर’मध्ये अभिनेता कर्करोगाने पीडित होता. ही भूमिका राजकुमारने केली होती. त्यानंतर हृषिकेश मुखर्जी यांचे दोन चित्रपट असे आले ज्यामध्ये कर्करोग पीडितांची कथा तयार झाली आणि ते दोन चित्रपट आजही स्मरणात आहे. ‘आनंद’ चित्रपटाला कोण विसरणार ज्यामध्ये राजेश खन्नाने या भूमिकेला अजरामर केले. आनंदनंतर हृषिदांनी मिलीमध्ये आणखी एक प्रयोग केला आणि नायिकेला कर्करोग पीडित दाखविले. जया बच्चनने ही भूमिका केली होती आणि क्लायमॅक्समुळे हा चित्रपट वादाचा विषय राहिला. अमिताभ बच्चनने विपुल शाह दिर्ग्दर्शित वक्तमध्ये ही भूमिका केली. नरगिसचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतर सुनील दत्त यांनी या जीवघेण्या आजारावर अजंता आर्टमध्ये ‘दर्द का रिश्ता’ हा चित्रपट केला होता, ज्यामध्ये त्यांच्या लहान मुलीला कर्करोग झालेला असतो. ही भूमिका बेबी खूशबूने केली होती. जी पुढे एक मोठी दाक्षिणात्या अभिनेत्री झाली. या चित्रपटाला आजही कर्करोगावर बनलेल्या चित्रपटांच्या यादीत हिट मानले जाते. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘याद रखेगी दुनिया’मध्ये आदित्य पंचोलीने अशाच कर्करोगी प्रेमीची भूमिका केली होती. प्रत्येक चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्यालाच कर्करोग होतो असेही नाही, राजकुमार हिरानींचा पहिला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये जिमी शेरगिलने कर्करोग पीडित जहीरच्या भूमिकेसाठी वाहवा मिळविली होती. तर ‘चाइना गेट’मध्ये डॅनीची भूमिका रक्ताच्या कर्करोगाने पीडित होती.