बनावट कॅटरींग इन्स्पेक्टरच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:10 AM2019-09-05T02:10:15+5:302019-09-05T02:10:19+5:30
कर्जत रेल्वे सुरक्षा बल : कमर्शिअल विभागाची कारवाई
कर्जत : काही दिवसांपासून कल्याण बदलापूर रेल्वे स्थानकात बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून धुमाकूळ घालणा-या भामट्यास रेल्वे सुरक्षा बलाने कर्जत रेल्वे स्थानकात रंगेहात पकडले. ही व्यक्ती रेल्वे स्थानकातील कॅटरींग व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे कॅटरींग इन्स्पेक्टर बनून त्यांच्याकडील वस्तू तपासण्याचे नाटक करत त्यांना हजारो रुपयांचा गंडा घालत होता.
हे छायाचित्र कर्जत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांना ही व्हॉटसअपद्वारे मिळाले होते. अशातच स्वत:ला कॅटरींग इन्स्पेक्टर म्हणवणारा भामटा ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील फलाट क्रमांक एक वरच्या कॅटरींगचे मॅनेजर मुलायम सिंग ह्यांची चौकशी करायला आला. ही चौकशी सुरू असताना कर्तव्यावर असलेले आरपिएफ कर्मचारी मुक्कदर तडवी व पंकज सिंग यांना त्याच्या हालचालीवर संशय आला. त्यामुळे त्यांनी बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनुन आलेल्या व्यक्तीस आरपीएफ कार्यालयात अणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांच्या समोर हजर केले. सिंग यांनी त्याची कसुन चौकशी केली असता या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला. कल्याण, बदलापुर येथेही आपण बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून गेलो होते असे सांगितले. या व्यक्तीचे नाव मोहम्मद खान ( ४०) असून तो पूजा नगर, मीरा रोड येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर उर्फ मोहम्मद खान ह्याची चौकशी करुन सिंग यांनी त्याला कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डोंगरे यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोपविले.
च्काही दिवसांपासून कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती कॅटरिंग इन्स्पेक्टर असल्याचे भासवत स्टॉल धारकांना जेरीस आणत त्यांना हजारों रुपयांना लुबाडत असल्याच्या घटना घडत होत्या.
च्या व्यक्तीचा शोध सर्व रेल्वे स्थानकांवर घेण्यात येत होता. या बनावट व्यक्तीचे छायाचित्र हाती लागताच कर्जत विभागातील मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शिअल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे त्यांनी ते रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवून कारवाईचे आदेश दिले.