बनावट डीव्हीडींचे चंदेरी दुनियेला लागले ग्रहण

By admin | Published: January 5, 2016 02:02 AM2016-01-05T02:02:48+5:302016-01-05T02:02:48+5:30

क्रिकेट, टीव्ही, सर्कस आदींपेक्षा मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो पाहणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो.

Fake DVDs found in Chanderi world | बनावट डीव्हीडींचे चंदेरी दुनियेला लागले ग्रहण

बनावट डीव्हीडींचे चंदेरी दुनियेला लागले ग्रहण

Next

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
क्रिकेट, टीव्ही, सर्कस आदींपेक्षा मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो पाहणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो. परंतु अलीकडे पायरसी प्रकारामुळे या चंदेरी दुनियेला ग्रहण लागले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आता तो काही तासांतच इंटरनेटवर पाहावयास मिळत आहे. प्रदर्शनापासून अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या बनावट सीडी, डीव्हीडी बाजारात उपलब्ध होतात. या आॅफलाइन तसेच आॅनलाइन पायरसीने चित्रपटसृष्टीतील नफा वेगाने कमी करण्यास सुरु वात केली आहे. रायगड जिल्ह्यात याचे लोण वाढत असून, त्याचा फटका चित्रपटसृष्टीला बसत आहे.
नवीन चित्तपट, उत्तम दर्जाचे चित्र आणि आवाजासह डाऊनलोड करण्याची सुविधा पुरविणाऱ्या अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत. त्यामुळे चित्रपट उद्योगाच्या नफ्यात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.बॉलीवूडचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ब्रँड किंवा कंपनीच्या सीडी, डीव्हीडी बाजारात येण्यास महिना ते दोन महिने लागतात. मात्र बनावट सीडी आणि डीव्हीडी प्रदर्शनादिवशीच विक्र ीस उपलब्ध होत आहेत. सध्या इंटरनेटद्वारे डाऊनलोडिंग फास्ट होते. त्यातच फ्री, अनलिमिटेड डाऊनलोडिंग अशा नेटच्या सुविधांमुळे फटका बसतोय. यावर नियंत्रण हवे असल्याचे अधिकृत सीडी विके्र त्यांचे म्हणणे आहे. बनावट सीडी विक्र ीच्या तक्र ारी आहेत. मात्र बनावट सीडी, डीव्हीडी निदर्शनास आल्या तर आम्ही संबंधितास फक्त ताब्यात घेऊ शकतो. त्या सीडी बनावट आहेत की नाही, हे तपासणारी यंत्रणा पनवेलच काय समस्त रायगडात नाही. मुंबई येथून अशा बनावट सीडी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुठल्याही अश्लील साहित्याची विक्र ी करणे किंवा अशा प्रकारचे साहित्य सोबत बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अश्लील सीडी विक्र ीचा व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या व्यवसायातून पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथे महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

Web Title: Fake DVDs found in Chanderi world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.