फराटपाडामध्ये विनापरवाना सुरुंग स्फोट, ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्याचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:09 AM2019-02-07T03:09:59+5:302019-02-07T03:10:10+5:30

कर्जत तालुक्यात फार्महाउसची संस्कृती अवतरली असून, सर्व ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडविण्याचे प्रकार केले जात आहेत.

Falatapada unpunished energetic explosion, 300 feet high hill construction | फराटपाडामध्ये विनापरवाना सुरुंग स्फोट, ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्याचे काम

फराटपाडामध्ये विनापरवाना सुरुंग स्फोट, ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्याचे काम

Next

कर्जत : तालुक्यात फार्महाउसची संस्कृती अवतरली असून, सर्व ठिकाणी शासनाचे आदेश पायदळी तुडविण्याचे प्रकार केले जात आहेत. तेथे जमीन सपाटीकरण करण्यासाठी ३०० फूट उंचीची टेकडी फोडण्यात येत आहे. त्यासाठी सुरुं ग स्फोट केले जात असून, सुरुंग स्फोट करण्यासाठी महसूल विभागाने परवानगी दिली नाही.

साळोख ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या फराटपाडा गावातील सर्व्हे नंबर ५९ मधील काही जमीन ग्रीन स्पेस कंपनीच्या मालकीची आहे. त्या ४.७८ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या माळकस जमिनीचे या कंपनीने बिनशेतीमध्ये रूपांतर केले आहे. त्या जमिनीत साधारण ३०० फूट उंचीची टेकडी असून, त्या टेकडीत ग्रीन स्पेस कंपनीची अर्धी जागा व्यापली आहे. त्यामुळे जमीन विकसित करण्यासाठी या कंपनीला त्या टेकडीचा अडथळा येत होता. त्यामुळे ती टेकडी फोडण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्याबद्दल महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करण्यासाठी ग्रीन स्पेस कंपनीला नोटीस पाठवली होती. मात्र, त्या नोटिसीला उत्तर देताना बिनशेती जमिनीला उत्खनन कायदा लागू नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे महसूल प्रशासन हतबल झाले होते, तर साळोख ग्रामपंचायतीने पाठवलेल्या नोटिसाला उत्तर देताना तुम्ही चुकीच्या नावाने नोटीस पाठवली आहे, असे लेखी कळवले होती.

ग्रीन स्पेस कंपनीने आॅक्टोबर २०१८ पासून टेकडी फोडण्यासाठी
सुरुंग स्फोट करण्यास सुरु वात केली आहे. सुरुं ग स्फोट हे स्फोटक असल्याने त्यासाठी महसूल विभागाची परवानगी घ्यायची असते. मात्र, केवळ अर्ज करून गेले तीन महिने बिनदिक्कतपणे सुरुं ग स्फोट केले जात आहेत.

आम्ही जमीन उत्खनन आमच्या जागेत करीत असून, त्याच सर्व्हे नंबरमध्ये त्या मातीचा भराव करून घेत आहोत. त्या कामास कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क भरावे लागत नाही. दुसरीकडे आम्ही सुरुं ग स्फोट करण्याची परवानगी मागितली आहे.
- दत्तात्रेय श्रीपाद दातार, संचालक, ग्रीन स्पेस

आमच्या कार्यालयाकडे ग्रीन स्पेस कंपनीने सुरुंग स्फोट करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, आमच्या कार्यालयाने अशी कोणतीही परवानगी दिली नाही, त्यामुळे तत्काळ सुरुं ग स्फोट बंद करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दगड फोडण्यासाठी केलेले सुरुं ग स्फोट यामुळे झालेली हानी आणि केलेले बेकायदा काम यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- अविनाश कोष्टी,
तहसीलदार, कर्जत

Web Title: Falatapada unpunished energetic explosion, 300 feet high hill construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड