संजय करडे
मुरुड-जंजिरा : धकाधकीच्या जीवनातून निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध हवा, नीरव शांतता अनुभवाची असेल तर रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्याशिवाय पर्याय नाही. निसर्गप्रेमी, पक्षी व वनस्पती अभ्यासक यांचे हे आवडते ठिकाण असून पानगळीचे आणि निमसदाहरित प्रकारचे हे अभयारण्य आहे.
रायगड जिल्ह्याला किनारपट्टीलगत हे अभयारण्य आहे. मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य असल्याने येथे मुंबई तसेच ठाणे, पालघर येथील पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. अभयारण्यात दरवर्षी २८०० मिलीमीटर एवढा पाऊस असून उन्हाळ्यातही येथील तापमान २५ ते ३० सेल्सियस एवढे असते. अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे उंच निलगिरीच्या झाडावर शेकरू हा दुर्मीळ प्राणी वसतीस्थानी आहे. महाराष्ट्रात एकूण ३२ अभयारण्य असून शेकरू केवळ भीमाशंकर व फणसाड अभयारण्यातच आढळून येतो. शेकरू म्हणजेच म्हणजेच मोठ्या आकाराची खार. पर्यटकांना या प्राण्यांचे खूप आकर्षण असून लाजाळू प्राणी म्हणूनही तो ओळखला जातो. फणसाड अभयारण्यात निसर्ग भ्रमंतीसाठी पायवाटांची निर्मिती करण्यात आली आहे.
अभयारण्यात जवळपास २७ पाणवठे असून बाराही महिने याठिकाणी पाणी असते. येथील चिखल घाण येथे प्राणी पक्षी निरीक्षणासाठी लंपन गृह बांधण्यात आलेले आहेत. तसेच धुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षण मनोरे बांधण्यात आलेले आहेत.स्थानिकरीत्या आढळून आलेले जांभा दगडांतील नवाबाने खास शिकारीसाठी बांधलेले आडोसे जागोजागी आजही पाहावयास मिळतात. निर्भर आकाश असताना दांडा येथील मनोऱ्यावरून अथांग समुद्राचे दर्शन होते. येथून अनेकदा समुद्री गरु डाचेही दर्शन होते. फणसाड अभयारण्यातील ही वनसंपदा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. याठिकाण्ीा पर्यटकांच्या सोयीसाठी नवनवीन उपक्रमही राबविण्यात येत आहेत.पक्ष्यांबरोबरच वनौषधीही विपुल प्रमाणातच्मुरु डपासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ ५४ चौरस किमी इतके आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणाºया वनस्पती येथे पाहायला मिळतात. किनाºयालगत अशा प्रकारची वनस्पती आढळणे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.च्भारतातील बहुतांशी अभयारण्ये तथा राष्ट्रीय उद्याने राजे-महाराजे व संस्थानिकांच्या शिकारीच्या हौसेखातर राखून ठेवलेल्या क्षेत्रापैकी आहेत. अशाच प्रकारे पूर्वीचे केसोलीचे जंगल हे नबाब सिद्दींचे राखीव शिकार क्षेत्र आजचे फणसाड अभयारण्य होय. १९८६ साली शासनाने अधिसूचित केले.च्फणसाडच्या जंगलात मोठ्या प्रमाणात ऐन, साग, किंजळ, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, करंज, हेद, काजू, डंबर, खवस, कोकम, जारूळ, मोहा, कळंब, अर्जुन आदी वनसंपदा आहे. सुमारे ५ फूट गारंबीची हिरवीकंच शेंग तसेच बºयाच वनौषधी याठिकाणी सापडतात. थंडीच्या हंगामात पक्षी निरिक्षक याठिकाणी मोठ्या संख्येने येतात.च्अभयारण्यात वन्य प्राण्यांमध्ये बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी व मोठी खार अर्थात शेकरू, बिबटे आदींचा समावेश आढळतो. तर सरपटणाºया प्राण्यांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जाती आढळतात.जैव विविधता प्रजातीपक्षी १६६प्राणी १७साप २७फुलझाडे ९०वृक्षे ७१८ (वेलींसह)अभयारण्यात वन्य प्राण्यांमध्ये बिबट्या, रानमांजर, सांबर