एसटीची उद्यापासून भाडेवाढ

By admin | Published: August 21, 2014 01:12 AM2014-08-21T01:12:03+5:302014-08-21T01:12:03+5:30

सूत्रनुसार प्रवासभाडय़ात 22 ऑगस्टपासून सरासरी 0.80 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Fare hike from tomorrow | एसटीची उद्यापासून भाडेवाढ

एसटीची उद्यापासून भाडेवाढ

Next
मुंबई : सातत्याने होणा:या डिङोल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला फटका बसत असून महामंडळाने आपोआप भाडेवाढ सूत्रनुसार  प्रवासभाडय़ात 22 ऑगस्टपासून सरासरी 0.80 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.   त्यामुळे एसटीच्या सर्व सेवांच्या तिकिटांच्या किमतीत साधारण 1 रुपया ते 6 रुपये अशी वाढ होणार होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे डिङोल दरवाढ झाली की फक्त 
राज्य परिवहन प्राधिकरणाला भाडेवाढीची कल्पना देऊन 
भाडेवाढ एसटी महामंडळ करू शकते. मात्र 22 ऑगस्टपासून अशी भाडेवाढ होणार असल्याची साधी माहितीही परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण 
यांना नसल्याचे बुधवारी 
एसटीच्याच एका कार्यक्रमात दिसून आले. 
एसटी महामंडळाकडून 0.80 टक्के भाडेवाढ करण्यात आली असून त्यामुळे साध्या, जलद आणि रात्रसेवा तसेच निमआराम सेवेत प्रति सहा किलोमीटरसाठी फक्त 5 पैसे अशी अत्यल्प वाढ आहे. साध्या आणि जलद सेवेच्या 27 किलोमीटरच्या प्रवासासाठी वाढ करण्यात आली नसून, शहरी सेवेच्या प्रवासभाडय़ात वाढ केलेली आहे. शिवनेरी प्रवाशांना मात्र दिलासा मिळाला असून पुणो-नाशिक शिवनेरी आणि पुणो-नाशिक शीतल निमआराम वातानुकूलित सेवेत फक्त 5 रुपये वाढ करण्यात आली आहे. तर साध्या, रात्र सेवा आणि निमआराम सेवेत एक रुपयापासून ते 6 रुपयांर्पयत वाढ आहे. एसटी महामंडळाने मार्च महिन्यापासून आतार्पयत केलेली ही चौथी भाडेवाढ आहे. 2014 मध्ये 7 मार्च रोजी 2.54 टक्के भाडेवाढ झाली होती. ही सर्वात मोठी भाडेवाढ होती. त्यानंतर महामंडळाकडून अत्यल्प भाडेवाढ सातत्याने करण्यात आली. 
 
च्मात्र या भाडेवाढीबाबत राज्याचे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण हेच अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. राज्य परिवहन प्राधिकरणाला भाडेवाढीच्या तीन दिवस अगोदर माहिती देऊन त्यानंतर एसटी महामंडळ भाडेवाढ करू शकते. यात अन्य कोणालाही भाडेवाढीची माहिती देणो गरजेचे नसते. 
च्मात्र बुधवारी एसटी महामंडळाच्या सलग 25 वर्षे विनाअपघात केलेल्या चालकांच्या सत्कार कार्यक्रमास हजेरी लावणा:या परिवहन मंत्र्यांना 22 ऑगस्टपासून भाडेवाढ होणार असल्याची माहितीच नसल्याचे दिसून आले. या कार्यक्रमानंतर परिवहन मंत्र्यांना 22 ऑगस्टपासून भाडेवाढ होणार असून, सातत्याने होणा:या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे विचारताच त्याची माहितीच नसल्याचे त्यांनी सांगितले. 
च्याबाबत त्यांनी सोबत असलेले एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले आणि डिङोल दरवाढीमुळे भाडेवाढ करावी लागल्याचे खंदारे यांनी परिवहन मंत्र्यांना सांगितले. त्यानंतर सारवासारव करीत महामंडळाने केलेली भाडेवाढ योग्य असल्याचे सांगत परिवहन मंत्र्यांनी काढता पाय घेतला.
 
क्षमतेपेक्षा पाच प्रवासी ज्यादा नेण्याची अजब सूचना
मुंबई : एसटी महामंडळाला सध्या तोटा होत असून तो कमी करण्यासाठी वाहतूक नियमांना डावलून महामंडळाकडून अजब सूचना केल्या जात आहेत. एसटी महामंडळाकडून 25 वर्षे अपघातविरहित सेवा देणा:या चालकांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. या वेळी क्षमतेपेक्षा पाच प्रवासी अधिक नेण्याची अजब सूचना एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी चालकांना केली. जास्त प्रवासी भरल्यानेही अपघात होत असताना महामंडळाकडून अशी सूचना करणो म्हणजे अपघातांना निमंत्रण देण्यासारखेच असल्याची चर्चा आहे. 
25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघातविरहित सेवा केलेल्या मुंबई विभागातील चालक आणि त्यांच्या पत्नींचा विशेष सत्कार दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आला. यावेळी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे व एसटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, अधिकारी व चालक उपस्थित होते. यावेळी 73 चालकांचा रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर भाषणात एसटीचे व्यवस्थापकीय संचालक खंदारे यांनी चालकांना सांगितले, की महामंडळाचा तोटा वाढतच आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत आहे. सध्या 200 कोटी रुपयांची तूट असून ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक चालकाने क्षमतेपेक्षा पाच तरी अधिक प्रवाशांची वाहतूक करावी. (प्रतिनिधी)
 
च्एसटीच्या बसची आसनक्षमता सध्या 45 असून, उभ्याने प्रवास करणा:या प्रवाशांची क्षमता ही 13 ते 15 आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रवासी नेण्याची सूचना म्हणजे हे अपघाताला निमंत्रण असल्याची चर्चा रंगली. 
च्अपघातविरहित चालकांच्या सत्कार कार्यक्रमात अशी सूचना करणो कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. या वेळी अधिकृत थांब्यांवरच चालकांनी बस थांबवून प्रवाशांना सहकार्य करण्याची सूचनाही त्यांनी केली.

 

Web Title: Fare hike from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.