कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कर्जत-मुरबाड मार्गालगतच्या शेतजमिनीच्या बाजूने महावितरण कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामासाठी करण्यात येणाºया खोदकामामुळे शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी वारे येथील शेतकºयांनी केली आहे.कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत वारे- खैरपाडा गावाजवळ महावितरणचे २२ किलोवॅटचे नवीन सबस्टेशन उभारले आहे. त्यासाठी कर्जत-मुरबाड राज्यमार्ग ३८ लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमीनीतून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे वारे गावातील काही शेतकºयांचे भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकºयांकडून महावितरणकडे करण्यात आली आहे.२२ किलोवॅट सबस्टेशनच्या उभारणीमुळे परिसरातील गावातील वीज वितरणात व्यवस्थित सुधारणा होणार आहे. तसेच परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीतपणे होणार असल्याने शेतकºयांनी महावितरण कंपनीच्या ठेकेदारास सहकार्य केले. परंतु काही ठिकाणी शेतातून तर काही शेतकºयांच्या रहदारीच्या रस्त्यावर केबल टाकण्यात येत असून त्यासाठी एक दोन फूट जमीन खोदण्यात येत आहे. काही भागात जमिनीवर, पावसाळी नाल्यातून केबल टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरने नांगरणी करणे धोक्याचे होऊ शकते, अशी भीती शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ आल्याने ठेकेदाराचे नियमबाह्य व नियोजनशून्य काम सुरू असून त्यासंबंधी तक्रारी महावितरणकडे करूनही दुर्लक्ष करून ठेकेदार कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त होत आहे.
केबल टाकताना शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची महावितरणकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:33 AM