फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन

By वैभव गायकर | Published: April 27, 2024 03:51 PM2024-04-27T15:51:31+5:302024-04-27T15:51:55+5:30

विस्तृत, सुलभ, जलद आणि तळागाळापर्यंत पोहचलेल्या नेटवर्कमुळे आता देशभरातील आंबा प्रेमी दर्जैदार आंबे घरपोच प्राप्त करू शकणार आहेत. 

Farm to Fork Hapus post service for mango lovers Aapk Dost India Post is the tagline | फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन

फार्म टू फोर्क हापूस आंबा प्रेमींसाठी पोस्टाची सेवा, आपका दोस्त इंडिया पोस्ट ही टॅगलाईन

पनवेल : फळांचा राजा समजला जाणारा आंबा देशातच नव्हे तर आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचणार आहे.'फार्म टू फोर्क' या नाविन्यपूर्ण संकल्पनेसह भारतीय पोस्ट विभागाने विस्तृत, सुलभ, जलद आणि तळागाळापर्यंत पोहचलेल्या नेटवर्कमुळे आता देशभरातील आंबा प्रेमी दर्जैदार आंबे घरपोच प्राप्त करू शकणार आहेत. 

विशेष म्हणजे पोस्टाच्या सेवांचे दर इतर खासगी कुरिअर सेवांपेक्षा कमी असून त्यामुळे ग्राहकांना कमी दरात आंबे घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. नवी मुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी सांगितले की, फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबई पोस्टानं एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी नवी मे. बेरीडेल फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला असून त्याद्वारे शेतातील ताजे व दर्जेदार हापूस आंबे थेट ग्राहकांच्या  घरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. भारतीय देशांतर्गत बाजारपेठे व्यतिरिक्त जपान, यूएसए, ऑस्ट्रेलिया, कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर आणि युरोप या देशांमधे सुद्धा कंपनी आपल्या फळांची निर्यात करत आहे. मे. बेरीडेल फुड्स प्रा लि ही जपानला आंबे निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहे.भारतीय डाक विभाग आणि प्रसिद्ध आंबा निर्यातदार मे. बेरीडेल फुड्स प्रा लि यांच्यातील सामंजस्य करार हा आंबा पुरवठा क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून  या भागीदारी अंतर्गत बेरीडेल फुड्स फक्त भारतातील ग्राहकांनाच नाही तर त्यांच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुद्धा विभागामार्फत त्यांचे दर्जेदार आंबे पोहचू शकणार आहे.
 

पोस्ट विभागाच्या 'रोड ट्रान्सपोर्ट नेटवर्क' च्या माध्यमातून 1200 किलो वजनाच्या 380 आंब्यांच्या पेट्यांची घरपोच डिलिव्हरी आतापर्यंत करण्यात आलेली आहे. आंबा उत्पादक शेतकरी आणि पुरवठादारांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी डाक विभागाच्या पार्सल सेवेचा तसेच  डाक विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरवण्यात येणाऱ्या 'रेल डाक गतीशक्ती योजने' चा वापर करावा असे आवाहन नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक मोहम्मद साहिद यांनी केले आहे.
 

'फॉर्म टू फोर्क अल्फांसो डिलिव्हरी' या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय टपाल खात्यानं हापुस आंबा पुरवठ्याच्या क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण क्रांती घडवून आणली असून या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय डाक विभाग आंबा उत्पादक आणि आंबाप्रेमी यांच्यामधील एक महत्वाचा दुवा ठरत आहे.

Web Title: Farm to Fork Hapus post service for mango lovers Aapk Dost India Post is the tagline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा