रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:51 AM2020-05-20T06:51:47+5:302020-05-20T06:57:54+5:30

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.

Farmers are busy preparing for kharif season in Raigad district | रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असली तरी पावसाळा जवळ येत असल्याने भर उन्हात शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज होत आहे.
रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.
जिल्ह्यात चालू वर्षात खरीप हंगामात १ लाख १४ हजार हेक्टरवर पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यामधील १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येईल. तर उर्वरित क्षेत्रांवर इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तयारी करत आहे. पालापाचोळा जमा करून, राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतीची नांगरणी करण्याचे काम सुरू आहे.
बैलजोडीच्या मदतीने पूर्वी मशागतीची कामे केली जात होती. मात्र आता या कामात शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरण्यास सुरु वात केली आहे. मशागतीच्या कामासाठी ट्रॅ्क्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, वखरणी, शेतीचे सपाटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.

मुंबईकरांचा कामाला हातभार
तळा : संपूर्ण जग कोरोना महामारी रोगाने हादरले आहे. लॉकडाउन व संचारबंदीमुळे मुंबईकर मंडळी गावाकडे आली आहेत आणि त्याचा फायदा शेतकºयांना होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. तळा तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतात मान्सूनपूर्व शेती-मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे.

Web Title: Farmers are busy preparing for kharif season in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड