गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:01 AM2020-12-15T01:01:33+5:302020-12-15T01:01:37+5:30

पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Farmers are in trouble due to soaking of cattle fodder | गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत

गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत

Next

वडखळ : अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण पेण तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक नष्ट झाले. वादळ आणि कोरोनाने शेतकरी खचून गेला असताना, भात आणि कडधान्यांच्या कोठार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतात या वर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहिले होते. त्यामुळे यंदा कडधान्य, मटकी, पावटा, वाल, हरभरा यांची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे या कडधान्यांच्या शेतीला बाधा येणार असल्याने शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. तर गुरांसाठी साठवून ठेवलेला पेंढा (सुका चारा) पावसात भिजला.

शेतकरी बागायतदार चिंतेत वाढ झाली आहे. या पडलेल्या अवकाळी पावसामुळे गुरांसाठी शेतात ठेवलेला पेंढा (सुका चारा) भिजल्यामुळे गुरांना चारा कुठून आणायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- गजानन पाटील, शेतकरी

Web Title: Farmers are in trouble due to soaking of cattle fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.