शेतक-यांची कर्जमाफी ऐतिहासिक निर्णय - प्रकाश मेहता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 06:49 AM2017-10-19T06:49:29+5:302017-10-19T06:49:47+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत शेतकºयांच्या थेट बँक खात्यात रक्कम भरून कर्जमुक्ती देण्याचा राज्य शासनाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत शेतकºयांच्या थेट बँक खात्यात रक्कम भरून कर्जमुक्ती देण्याचा राज्य शासनाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जमाफी योजनेस पात्र असणाºया २५ प्रातिनिधिक शेतकरी कुटुंबांचा सत्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले की, कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात सर्वात कमी थकीत कर्जदार शेतकरी आहेत. शेतकºयांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या हस्ते या वेळी जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकºयांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच त्यांचा सपत्नीक साडी चोळी, वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील उर्वरित पात्र शेतकºयांची प्रमाणपत्रे त्यांच्या घरी पोच करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ८०३ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील एकूण ३० हजार २५० कर्जदार सभासद या योजनेस पात्र असून त्यापैकी एकूण ५ हजार ४०८ थकबाकीदार शेतकरी आहेत. पीक कर्जाची मुदतीत कर्जफेड करणारे २४ हजार ८४२ शेतकरी आहेत.
शासन निर्णयानुसार आॅनलाइन अर्ज दाखल करणारे शेतकरी सदस्य २७ हजार ६९ आहेत. जिल्ह्यात एकूण विविध कार्यक्षेत्रातील १३० सेवा सहकारी संस्थांपैकी कर्ज वाटप केलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ११७ आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत उचल केलेल्या १६ हजार ९३० शेतकºयांपैकी १६६ थकबाकीदार आहेत. नियमित कर्जफेड केलेले १६ हजार ७६४ शेतकरी सदस्य आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज उचललेल्या १३ हजार ३२० शेतकºयांपैकी थकबाकीदार ५ हजार २४२ शेतकरी आहेत. नियमित कर्जफेड केलेले ८ हजार ७८ शेतकरी
आहेत.
या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभय यावलकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्जमाफीमुळे शेतकरी समाधानी
शासनाच्या कर्जमाफी धोरणामुळे माझे कर्ज माफ झाले आहे. माझ्या डोक्यावरील कर्जाचा आर्थिक भार शासनाने कमी केला आहे. त्यामुळे मी खूप आनंदी असून, कर्जमुक्ती योजनेबद्दल सरकारचा आभारी आहे. शेतक-यांचे कर्ज माफ झाल्यामुळे शेतक-ना नवा आत्मविश्वास प्राप्त होऊन आर्थिक सुबत्ता निर्माण होईल,अशी प्रतिक्रिया म्हसळा तालुक्यातील खामगाव येथील शेतकरी गणेश शिर्के यांनी दिली.
शासनाने शेतक-यांचा आवाज ऐकून शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. शेतकरी एवढ्या बिकट परिस्थितीत होते. शेतकरी कर्जमाफी केल्यामुळे शेतकरी सुखावले असल्याची प्रतिक्रिया म्हसळा तालुक्यातील पांगळोली येथील शेतकरी ईफतिहार मुकादम यांनी दिली आहे.
शासनाने शेतक-यांना कर्ज माफ केले त्याबद्दल मी शासनाचा आभारी आहे. कर्जमाफीमुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागला असल्याचे अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील शेतकरी परशुराम दामोदर मापगावकर यांनी सांगितले.
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील शेतकरी परशुराम दामोदर मापगावकर यांचा सपत्नीक सत्कार करताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता, शेजारी आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी आदी.