नैना प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:46 AM2018-05-01T02:46:22+5:302018-05-01T02:46:22+5:30
गेल्या सात वर्षात आंदोलने, ग्रामसभा, राजकीय नेत्यांच्या बैठका घेवूनही सिडकोने तालुक्यातील २३ गावांना ठेंगा दाखवत
पनवेल : गेल्या सात वर्षात आंदोलने, ग्रामसभा, राजकीय नेत्यांच्या बैठका घेवूनही सिडकोने तालुक्यातील २३ गावांना ठेंगा दाखवत शेतकºयांची पिळवणूक सुरू ठेवल्याने त्रासलेल्या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा सिडकोला निर्वाणीचा इशारा देत आक्र मकपणे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.
नैनाबाधित शेतकºयांच्या उत्कर्ष सामाजिक संस्थेने त्यांच्या नवीन पनवेल येथील कार्यालयात काल सायंकाळी महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी कांतीलाल कडू , संघटनेचे सल्लागार नामदेव फडके, अध्यक्ष वामन शेळके, खजिनदार एकनाथ भोपी, माजी सभापती राजेश किणी, युवा नेते सचिन ताडफळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सात वर्षात जिल्ह्यातील एकाही आमदाराला शेतकºयांच्या व्यथा अधिवेशन काळात सभागृहात मांडाव्या असे वाटू नये, यातूनच त्यांची सामाजिक भावना दिसून येते, अशी खंत वामन शेळके यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन आणि स्थानिक राजकीय नेत्यांच्या सभा, सिडकोसोबत बैठका घेतल्या. सिडको आमच्या जखमांवर मीठ चोळत असल्याने यापुढे शेतकºयांसाठी प्राण पणाला लावावे लागेल, असा निर्धार सल्लागार नामदेव फडके यांनी व्यक्त केली आहे.