अर्धलसाठी शहापूर येथे झाला शेतक-यांचा पहिला संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:05 AM2018-02-22T01:05:22+5:302018-02-22T01:05:24+5:30

सर्वच नेते शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा सर्व गावकी पारश्यांच्या बंगल्यावर हातात रिकामी मडकी घेऊन गेली, ती मडकी त्याच्या दारात फोडून ‘तुझ्या सगळ्या पिढ्यांचे वाटोळे होईल’ असा शाप देऊन परत आली

Farmer's first reception was held in Shahpur | अर्धलसाठी शहापूर येथे झाला शेतक-यांचा पहिला संप

अर्धलसाठी शहापूर येथे झाला शेतक-यांचा पहिला संप

Next

जयंत धुळप
अलिबाग : सर्वच नेते शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा सर्व गावकी पारश्यांच्या बंगल्यावर हातात रिकामी मडकी घेऊन गेली, ती मडकी त्याच्या दारात फोडून ‘तुझ्या सगळ्या पिढ्यांचे वाटोळे होईल’ असा शाप देऊन परत आली. या संप काळात शेती जरी ओस ठेवली तरी समुद्रकाठचे बांध शेतकºयांनी (कुळांनी) बांधून काढून शेती शाबूत ठेवली हे विशेष होते. पारशाची ७०० एकर शेती जरी ओस असली तरी शेतकºयांनी पर्यायी व्यवस्था म्हणून इतर सावकारांकडून जमिनी कसण्यास घेतल्या होत्याच, शेवटी घाबरून नादीरशाने तडजोड केली व ‘अर्धल’ मान्य केली. महाराष्ट्रामध्ये समन्याय पद्धतीची शेती पद्धत म्हणजेच अर्धा वाटा कुळाला व अर्धा वाटा सावकाराला म्हणजेच अर्धल मिळवून देणारा पहिला शेतकºयांचा संप शहापूर (अलिबाग) येथे झाला. या पिढीचे ९६ वर्षीय शांताराम भगत आज देखील हा इतिहास सांगतात. चरीच्या संपाच्या अगोदर, आमच्या वाडवडिलांनी संप केला, अर्धल मिळवली व चरीच्या संपाच्या मागणीचा पाया १९२६ च्या शहापूरच्या आंदोलनाने रचल्याचे भगत यांनी सांगितले.
आमचा इतिहास दडवला गेला याचे आम्हाला दु:ख आहे. त्या वेळेस शेतकरी फितूर झाले, सद्यस्थितीत टाटा-रिलायन्स लढ्यात देखील शेतकरी फितूर झाले. त्या वेळेचा १९६२ सालचा लढा शेतकºयांनीच दिला, आज देखील टाटा-रिलायन्सच्या विरोधातील लढा राजकीय शक्तींना बाजूला ठेवून शेतकरीच लढवतोय हा शहापूरचा इतिहास आहे. जमिनीवर जो कोणी डोळा लावील त्याचे वाटोळे होईल त्याची प्रचिती पूर्वीपासून आतापर्यंत येते आहे. जे कोणी त्याच्या व्यक्तिगत फायद्यासाठी शेती बुडवतात त्यांना देखील याची प्रचिती येईल, कारण हे जे भातशेतीचे कोठे आहेत त्या प्रत्येक कोठ्याचा देव आहे व त्या देवाच्या स्थानाच्या मळणीच्या वेळेस पूजा करून त्याला मान दिला जातो. गावच्या जमिनी ज्या रिलायन्सच्या भूसंपादनात समाविष्ट झाल्या होत्या त्या सहा वर्षांच्या शेतकरी लढ्यानंतर पुन्हा मुक्त झाल्या. १९२६चा लढा आणि २००५ ते २०११ चा शेतकरी लढा या दोन्ही लढ्यांचे साम्य म्हणजे शेतकºयांना त्याचा हक्क प्राप्त झाला, त्यांचा विजयी उत्सव गुढीपाडव्यास खिडकी (अलिबाग) येथे गेल्या २३ मार्च २०१२ रोजी दुपारी श्रमिक मुक्तीदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाने साजरा करण्यात आल्याची देखील आठवण शांताराम भगत यांनी सांगितली. शांताराम भगत यांचे नातू रीजन भगत यांनी शहापूर धेरंड नऊगाव खारेपाट कृती समितीच्या माध्यमातून या साºया इतिहासाचे संकलन करून ठेवले आहे.

Web Title: Farmer's first reception was held in Shahpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.