महामार्गबाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; केंद्राचा निधी अपुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:00 AM2019-06-20T00:00:01+5:302019-06-20T00:00:12+5:30

सव्वाशे शेतकऱ्यांना ६८ कोटींचे वाटप शिल्लक

Farmers with highway waiting for compensation; Center funding is insufficient | महामार्गबाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; केंद्राचा निधी अपुरा

महामार्गबाधित शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत; केंद्राचा निधी अपुरा

Next

- सिकंदर अनवारे 

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहेत. या कामात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि घरे बाधित झाली आहेत. केंद्र सरकारकडून वाटपासाठी अपुरा निधी आल्याने आजही शेकडो शेतकरी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी नागरिक महाड येथील प्रांत कार्यालयात फेºया मारत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गेली दोन वर्षांपासून सुरवात झाली आहे. केंद्र सरकारकडून चौपदरीकरणात बाधित होणाºया जमिनीचे तसेच बांधकामांचे सर्व्हे करत त्यांचे भूसंपादन देखील करण्यात आले. संपादित करताना संबंधित खात्याकडून अनेक चुका करण्यात आल्या. याचा फटका मात्र बाधित नागरिकांना बसला. तक्रारीनंतर पुन्हा काही ठिकाणच्या तपासण्या करण्यात आल्या. यामुळे अनेक नागरिकांच्या जमिनी तसेच बांधकामे बाधित होत असल्याचे निष्पन्न झाले. पुन्हा या सर्व्हेचा अहवाल तयार करून मोबदला देण्याची तयारी सरकारने दर्शवली. मात्र या नागरिकांना सरकारकडून एकही रुपया मिळाला नसून पैशासाठी वारंवार महाड प्रांत कार्यालयाचा फेºया मारल्या जात आहेत.

महाड आणि पोलादपूर तालुक्यात एकूण साडेचार हजार शेतकरी चौपदरीकरणाच्या कामामुळे बाधित होत आहेत. केंद्र सरकारकडून मोबदल्यापोटी साडेचारशे कोटी इतकी रक्कम अपेक्षित असताना ३८२ कोटी रक्कम महाड महसूलकडे आली आहे. या सर्व पैशाचे वाटप होऊन फक्त २२ लाख रुपये शिल्लक आहे. आजही १२५ शेतकºयांना मोबदला वाटप होणे गरजेचे असले तरी यासाठी ६८ कोटी रक्कम येणे अपेक्षित आहे.

चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे जरी काम जोराने सुरू असले तरी पैसा न मिळालेले शेतकरी ठेकेदाराला आपल्या जमिनीत काम करू देत नसल्याने आजही अशा ठिकाणी काम बंद आहे. अशा परिस्थितीत दुसºया टप्प्यातील चौपदरीकरण काम पुढील दोन वर्षात तरी मार्गी लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रांत कार्यालयाकडून सव्वाशे शेतकºयांचा अहवाल दोन वेळा महामार्ग विभागाला पाठवण्यात आला आहे. ज्या जमीन बाधितांना मोबदला मिळालेला नाही, ते ठेकेदाराला काम करण्यास अडवत आहेत. या लोकांची समजूत काढण्यात येत आहे. निवाड्याची रक्कम प्राप्त होताच संबंधितांना मोबदला अदा करण्यात येईल.
- विठ्ठल इनामदार,
प्रांत अधिकारी,महाड

Web Title: Farmers with highway waiting for compensation; Center funding is insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.