दासगाव : सध्या महाड तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. गेल्या १५ दिवसांपासून दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याचा वाºयासह संपूर्ण महाड तालुक्यात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. सध्या भात शेती कापणीसाठी तयार होत असताना सततच्या पाऊस, वाºयामुळे ही शेती जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे इतर नुकसानीसोबत या पावसामुळे भातशेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.गेल्या १५ दिवसांपासून महाड तालुक्यात वादळी वारा तसेच विजेचा गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या या पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दर दिवशी विजेच्या तडाख्यामुळे चार ते पाच तास वीज गायब राहते, तर दर दिवशी या वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर उडणे, घरांवर झाड कोसळणे तसेच घरांवर वीज कोसळणे हे सुरूच आहे. अशा परिस्थितीला सामोरे जात असताना मात्र मोठा प्रश्न शेतकºयांसमोर उभा राहिला आहे. या पावसामुळे गौरीच्या सणामध्ये पसवून आॅक्टोबरअखेर कापणीसाठी तयार होणारी भात शेती मात्र जमीनदोस्त झाली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा परतीच्या पावसाने महाड तालुक्याला विजेच्या गडगडाटासह झोडपून काढले आहे. तसेच दर दिवस सुटणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर, कौले तसेच झाड घरांवर कोसळणे, विजेच्या तारांवर कोसळणे हे सुरूच आहे.सध्याच्या परिस्थितीत महाड तालुक्यातील नागरिक या परतीच्या पावसाने हैराण झाले आहेत. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी हवालदिल : पावसाचा भात पिकाला फटका , महाड तालुक्यात पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:43 AM