- कांता हाबळेनेरळ - कर्जत-मुरबाड राज्यमार्गाला आता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मार्गाच्या रुंदीकरणासाठी एमएसआरडीसीकडून सर्व्हेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे; परंतु कर्जत तालुक्यातील ज्या गावातून हा मार्ग जात आहे, तेथील शेतजमिनी रस्ता रुंदीकरणात जात आहेत. प्रशासनाने याबाबतीत काही शेतकºयांना कोणत्याही प्रकारची माहिती अथवा नोटीस न देता काम सुरू केल्याने शेतकरी नाराज असून शेतजमिनीचा मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.जोपर्यंत शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी कर्जत तालुक्यातील कळंब, वारे, पोही गावातील बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. कर्जत-मुरबाड रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग झाला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे काँक्र ीटीकरणाचे टेंडर सुद्धा निघाले आहे; परंतु हा रस्ता नक्की किती मीटर होणार आहे? साइडपट्टी किंवा गटार यांची रु ंदी किती मीटर असेल. ज्या गावांतून रस्ता जात आहे, त्या गावातील दुकाने आणि घरे तोडणार का? अनेक वर्षांपूर्वी जुना रस्ता बांधण्यासाठी काही ठिकाणी भूमिअधिग्रहन झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु काही गावांमध्ये यापूर्वी कोणालाही मोबदला मिळाला नव्हता.तसेच ७/१२ उताºयावर तशी नोंद ही झालेली नाही किंवा त्याचे क.जा.प.(आकार फोड- कमी जास्ती पत्रक) झाले नाही त्या शेतकºयांबाबत सरकारचे काय धोरण असणार आहे किंवा आता ज्या ठिकाणी वळण आहे ते काढून रस्ता सरळ करण्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी जाणार त्यांना नक्की किती आणि कधी मोबदला मिळणार याबाबत सर्व बाधितांच्या मनात संभ्रम आहे.ठेकेदार कंपनीने काही दिवसांपासून रस्त्याच्या सर्व्हेचे काम सुरू केले आहे. त्यांनी मार्किंग करीत असताना रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर, वीस मीटर आणि काही ठिकाणी पंचवीस मीटरवर मार्किंग केल्याने अजूनच संभ्रम वाढला आहे. ठेकेदाराने किंवा एमएसआरडीसीच्या अधिकाºयांनी काम सुरू करण्यापूर्वी ज्या गावांतून किंवा ज्यांच्या जमिनीतून रस्ता जाणार आहे त्यांची बैठक घेऊन माहिती देणे गरजेचे होते, परंतु कोणालाही विश्वासात न घेता हे काम सुरू केल्याने शेतकरी संतापले आहेत.रोजीरोटीचा प्रश्नकर्जत तालुक्यातून जाणाºया व समृद्धी मार्गास जोडणाºया या राष्ट्रीय मार्गाच्या रु ंदीकरणामुळे आमच्या शेतजमिनी, घरे, दुकाने जात असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे, दुकानदार बेरोजगार होणार आहेत त्यामुळे आम्हाला शासनाने योग्य मोबदला द्यावा, नंतर रस्त्याचे काम करावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीकडून करण्यात येत आहे.सरकार अन्यायाने जमिनी बळकावणार असेल तर याला शेतकरी प्रखर विरोध करतील हे अधिकाºयांनी ध्यानात घ्यावे, उगाचच मनमानी करू नये. या विरोधात आम्ही नक्कीच खूप मोठा लढा उभारू.- उदय पाटील, सरचिटणीस,राष्ट्रवादी युवा संघटना कर्जत
रुंदीकरणात शेतजमिनी बाधित, शेतकऱ्यांचे शासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 3:29 AM