सेव्हन स्टार रिसॉर्टमुळे शेतकऱ्याचे नुकसान
By admin | Published: June 10, 2017 01:15 AM2017-06-10T01:15:16+5:302017-06-10T01:15:16+5:30
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरू आहे. या रिसॉर्ट मालकाने त्याच्या रिसॉर्टमधील संपूर्ण सांडपाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरू आहे. या रिसॉर्ट मालकाने त्याच्या रिसॉर्टमधील संपूर्ण सांडपाणी समोरील शेतकरी शहाजी ठाकरे यांच्या शेतात सोडल्याने आणि दारूच्या बाटल्या शेतात टाकल्याने या शेतकऱ्याची संपूर्ण शेती नापीक झाली आहे. अनेक वेळा या हॉटेल मालकाशी संपर्क करून हॉटेल मालक या शेतकऱ्याला दमदाटी करत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने नेरळ पोलीस ठाण्यात आणि कर्जत तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे.
आसल ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरु आहे. या रिसॉर्टला लागून आसलमधील ग्रामस्थ शहाजी धोंडू ठाकरे यांची जमीन मिळकत आहे. या जमिनीत सेव्हन स्टार रिसॉर्ट मालकाने मनमानी करत आपल्या रिसॉर्टमधील सांडपाणी आणि दारूच्या बाटल्या त्यांच्या शेतात टाकल्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांची संपूर्ण जमीन नापीक झाली आहे. पावसाला सुरु वात झाली असल्याने आपल्या शेतात शेती कशी पिकवायची असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. या संदर्भात ठाकरे यांनी सेव्हन स्टार रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापकांना अनेक वेळा या समस्येविषयी विचारणा केली असता त्यांना ते दमदाटी करत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या शेतकऱ्याच्या शेतात पाणी सोडताना त्यांनी कसल्याही प्रकारची विचारणा न करता आपल्या मनमानी पद्धतीने शेतात पाणी सोडून शेतकऱ्याची जमीन नापीक केली आहे. तसेच या रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान होत असून त्यानंतर रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या या शेतकऱ्याच्या शेतात आणून टाकत आहेत. तसेच या रिसॉर्टमुळे अनेक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शहाजी ठाकरे यांचा शेतीवरच उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु या रिसॉर्ट मालकाने त्यांची शेती पूर्ण नापीक केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात शेतकरी शहाजी ठाकरे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आणि तहसीलदार कर्जत यांच्याकडे तक्र ार केली आहे. तरी लवकरात लवकर शेतातील दारूच्या बाटल्या आणि सोडलेले सांडपाणी काढून टाकावे आणि रिसॉर्ट मालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.