विरार अलिबाग कॉरिडॉर विरोधात पनवेल मधील शेतकऱ्यांचा मोर्चा
By वैभव गायकर | Published: May 10, 2023 12:05 PM2023-05-10T12:05:35+5:302023-05-10T12:05:43+5:30
केरळ राज्यात भूसंपादनात अधिकचा दर लागू आहे.तोच मोबदला महाराष्ट्र शासन का देत नाही असा सवाल यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या पळस्पे येथील शेतकरी संजय भगत यांनी उपस्थित केला आहे.
पनवेल- विरार अलिबाग कॉरिडॉर पनवेल मधून जात आहे.या कॉरिडॉरमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. भूसंपादन प्रक्रियेला देखील सुरुवात झाली असुन शेतक-यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रोश व्यक्त करीत दि.10 रोजी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत 2013 च्या भूसंपादन कायद्या अंतर्गत जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली आहे.
केरळ राज्यात भूसंपादनात अधिकचा दर लागू आहे.तोच मोबदला महाराष्ट्र शासन का देत नाही असा सवाल यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या पळस्पे येथील शेतकरी संजय भगत यांनी उपस्थित केला आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती या अखिल भारतीय किसान सभेशी संलग्न असलेल्या संघटनेने हा मोर्चा आयोजित केला होता.या मोर्चात मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित शेतकरी सहभागी झाले होते.मोर्चेकरांनी दुपारी भर उन्हात पनवेल शहरातील प्रांत कार्यालयासमोर धरणे देत शासनाच्या धोरणांचा निषेध केला.