रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४७ कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 11:49 PM2020-01-06T23:49:59+5:302020-01-06T23:50:03+5:30
गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून तर गेलाच; शिवाय शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच उभा होता.
आविष्कार देसाई
अलिबाग : गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून तर गेलाच; शिवाय शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच उभा होता. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतीचे कर्ज माफ केले आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार शेतकºयांची ४६ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यांत शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेतीनिगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे. त्यांना शेतीकामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आला आहे. त्याला दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.
यासाठी प्रत्येक गावस्तरावर, तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर शेतकºयांच्या माहितीसाठी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. शिवाय राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची फरफट टाळण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाने शेतकºयांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना मध्यंतरी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.