अलिबाग : टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड गावांतील अतिरिक्त संपादित जमीन परत मिळावी या मागणीकरिता गेल्या ३ जून रोजी रायगड जिल्हा प्रशासनास १५० शेतकऱ्यांनी मागणीपत्रे दाखल केली होती. त्यावर कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नसल्याने,त्याच मागणी पत्रात नमूद केल्याप्रमाणे सोमवारी शहापूर ग्रामस्थांचे दैवत म्हसोबा देवास गाºहाणे घालून, शपथ घेवून तब्बल १०० शेतकरी आपल्या या मागणीच्या पूर्ततेकरिता मुंबईतील अंधेरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या कार्यालयात रवाना झाले. याबाबतची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.
टाटा पॉवर कंपनीच्या १६०० मे. वॅट औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एमआयडीसी अधिनियम १९६१ अन्वये, महसूल खात्याच्या चुकीमुळे अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावांतील संपादित झालेल्या जमिनीपैकी, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या अहवालानुसार १२९.२६५ हे. आर जमीन अतिरिक्त ठरत असल्याने, सरकारी निवाडा रक्कम न स्वीकारलेले व प्रकल्पास संमती न दिलेल्या शेतकºयांची जमीन विना अधिसूचित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी सादर करावा या मागणीकरिता या दोन गावांतील १५० पेक्षा अधिक शेतकºयांनी व्यक्तिगत मागणीपत्रे ३ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली आहेत. तशीच मागणीपत्रे भूमी संपादन यंत्रणा असणाºया महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अंधेरी येथील कार्यालयात दाखल करीत असल्याचे भगत यांनी सांगितले.आंदोलनाचा इशाराजोपर्यंत उपमुख्य कार्यकारी अभियंता एमआयडीसी आणि शेतकºयांची प्रतिनिधी संघटना श्रमिक मुक्ती दल यांची बैठक होत नाही तोपर्यंत संपूर्ण संपादित झालेली जमीन परस्पर दुसºया कंपनीस देण्याचा विचार देखील एमआयडीसीने करू नये तसे केल्यास अंधेरी येथील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे बंद पाडील असा इशारा शेतकरी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळास दिला.