शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

माणगाव तालुक्यातील भातशेती पाण्यात गेल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:12 AM

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे.

माणगाव : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे, नदीनाल्यांचे, पुराचे पाणी शेतात राहिल्याने भातशेती खराब झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसानीमुळे घाबरला आहे.शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने भातशेतीची लावणी करून घेतली. या संततधार पावसाने काही भागातील लावणीसुध्दा करावयाची बाकी राहिली आहेत तर भातशेतीचे आवाण(रोप) चांगली उगवली, परंतु या पावसाचे पाणी तुडुंब शेतात भरल्याने रोपे कुजली आहेत. त्यामुळे शेतकरी आवाण (रोप) लावण्याकरिता आवाण शोधत फिरताना दिसत आहेत.माणगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता सदर डोंगर, टेकड्या, नद्या-नाले यांनी व्यापले आहे.त्यामुळे या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यावर डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी त्या त्या ठिकाणच्या नाल्यातून ओहळाद्वारे नदीत जाते. या पाण्यामुळे माणगावमधील काळ नदीस पूर येते. पुराचे पाणी सखल भागातील भातशेतीत घुसल्याने भातशेती खराब झाली आहे. पर्यायी शेतकºयाची मेहनत व आर्थिक नुकसान माणगाव तालुक्यात झाले आहे.माणगाव विभागात गोरेगाव विभाग, पेण- खरवली विभाग, मोर्बा विभाग, लोणेरे विभाग, इंदापूर विभाग, निजामपूर विभागातील शेतकºयाची हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली येवून नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत मिळावी ही मागणी होत आहे.>संततधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सखल भागातील शेती कुजून खराब झाल्याचे, तसेच लावणी केलेली शेती सुध्दा खराब होवू लागल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० ते ४०० एकर शेतजमीन तालुक्यात खराब झाल्याचे दिसते, तरी उर्वरित रोपे शेतकºयांनी एककाडी पध्दतीने शेती करावी जेणेकरून रोपे कमी लागतील.-पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी, माणगाव>आमच्या शेतीची लावणी लवकर केली होती. परंतु या सततच्या पडणाºया पावसाने आमची भातशेती पाण्यात बुडून गेल्याने खराब झाली आहे.-उदय गायकवाड, शेतकरीमाझ्या शेतीमधील आवाण पावसाने खराब झाले आहे. आता या शेतीत आवाण शोधण्याकरिता मी फिरत आहे.-दुर्वास म्हशेळकर,शेतकरी, गोरेगाव