नेरळ : महिन्याभरापूर्वी पोशीर गावात पुराच्या पाण्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे अनेकांची शेती वाहून गेली, तर अनेकांचे शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. याबाबत तलाठी आणि कृषी विभागाचे अधिकारी यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणूनही दीड महिना उलटूनही अद्याप नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करण्यात आलेला नाही. कृषी अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने शेतीचे पंचनामे अद्याप करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जत तालुक्यात १६ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यात अनेक शेतकºयांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाकडून अनेक ठिकाणी, गावागावांत पंचनामे करण्यात आले असले तरी पोशीरमध्ये नुकसान झालेल्या शेतीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नाहीत. मेहनतीने लावलेली शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नुकसान झालेल्या शेतीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, कृषी व महसूल अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दोन्ही विभागांकडून शेतकºयांकडे दुर्लक्ष होत आहे.कृषी सहायक अधिकारी यांनी आठडाभरापूर्वी येऊन दोन ते तीन शेताची पाहणी केली; परंतु पंचनामे केले नाहीत. या नुकसान झालेल्या शेतीची ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश असताना मात्र कृषी आणि तलाठी त्यांच्यात समन्वय नसल्याने दिसून येत आहे. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि झालेल्या शेतीची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पोशीरमधील शेतकºयांनी केली आहे.पुराच्या पाण्याने लावलेली शेती वाहून गेली आहे. तसेच शेताच्या बांधांची मोठ्या प्रमाणात धूप झाली असून, माती शेतात आली आहे. तसेच अनेक शेतकºयांची शेती वाहून गेली असून शेताचे बांधही फुटून दगड माती शेतात आली असल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई मिळावी.- काशिनाथ राणे, शेतकरी, पोशीरग्रामसेवक, तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी मिळून हे पंचनामे करण्याचे आदेश आहेत, अनेक ठिकाणी पंचनामे झाले आहेत. बिरदोले आणि पोशीर विभागात तत्काळ पंचनामे करण्यास सांगितले जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतशेतीच्या नुकसानासंदर्भात तलाठी आणि कृषी सहायक अधिकारी यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता, दोन्ही विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, म्हणजेच कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याने पोशीरमधील शेतकºयांच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे राहिले असल्याचे उघड आहे.
शेतीचे पंचनामे रखडले; सरकारी यंत्रणेत समन्वयाचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:18 AM