सावलीचा पाणीप्रश्न गंभीर, माजी सरपंच मंदा ठाकूर यांचे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:51 AM2018-04-06T06:51:37+5:302018-04-06T06:51:37+5:30
सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून
आगरदांडा - सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले असून, मिठागर महिला व ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होवून त्यांना पाठिंबा दिला आहे.
या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक अविनाश दांडेकर, अनंता ठाकूर, पंचायत समिती सदस्य आशिका ठाकूर, भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अॅड.महेश मोहिते, नितीन पवार, मानवअधिकारी संघटनेचे अध्यक्ष जाहीद फकजी, प्रवीण बैकर, उदय सबनीस, संजय भायदे, वृषाली कचरेकर, नेहा पाके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
माजी सरपंच मंदा ठाकूर यावेळी बोलताना म्हणाल्या, गेले १0 वर्षे मिठागर खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सन २00९-२0१0मध्ये ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२मध्ये मिठागर येथे राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसऱ्या योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करून एकूण १ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झाले आहेत.परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले. त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्ष पूर्ण होवून सुध्दा गावामध्ये पाण्याचा एक थेंब ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही.तथापि या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत मुरु ड तहसीलदार कार्यालयाजवळ १८एप्रील २0१७रोजी उपोषण केले होते. त्या उपोषणात शासनमार्फत तीन लेखी आश्वासने दिली होती. त्यास एक वर्ष होऊन सुध्दा शासन दरबारी अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता अथवा त्याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याचे ठौकूर यांनी सांगीतले.याबाबत शासनाला १४मार्च २0१८रोजी स्मरणपत्र देखील दिले होते, परंतु शासनाकडून कार्यवाही नाही. शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरु च राहणार असे मंदा ठाकूर अखेरीस म्हणाल्या.
भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अॅड.महेश मोहिते म्हणाले की, येत्या ९ तारखेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुरु डमध्ये येणार आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२ मध्ये मिठागर येथे आणखी राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसºया योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करु न एकूण १ कोटी २५लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत.त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून ठेकेदार व अधिकाºयांवर कार्यवाही करणार असल्याचे अॅड. मोहितेने उपोषणकर्त्यांना आश्वासीत केले. शासनाचा अधिकारी दुपारपर्यंत फिरकला नाही.