शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

उमेदवारांचे भवितव्य आज होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 7:13 AM

रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायतींपैकी १५९ ग्रामपंचायतींकरिता रविवारी ५६२ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील वृद्ध व अपंग मतदारांनीदेखील उत्स्फूर्तपणे मतदान केले. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ८० टक्केपर्यंत मतदान झाले आहे. रोह्यात दुपारपर्यंत ७० टक्के, महाडमध्ये ६५ टक्के, अलिबागमध्ये ७० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील एकूण मतदानाची आकडेवारी ५.३० वाजेपर्यंत ८० टक्के एवढी झाली होती.रायगड जिल्ह्यात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, भाजपा या सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी ताकद लावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तप्त होते.अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर १८७ ग्रामपंचायतींपैकी ३९ सरपंच, तर १६४७ पैकी ५५३ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १४४ जागांसाठी २५८२ विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सकाळी ७.३० ते सायं. ५.३० यादरम्यान पार पडलेल्या मतदार प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे.सकाळी जिल्ह्यात ७.३० वा. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक १६.४५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी १८.९७ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत सार्वत्रिक ३७.८५ टक्के, तर पोटनिवडणुकीसाठी ४२.२१ टक्के मतदान झाले. दुपारी १.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ५७.३६ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सार्वत्रिक ६९.१५ टक्के तर पोटनिवडणुकीसाठी ६८.३४ टक्के मतदान झाले.सकाळी ७.३०ला जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत मतदारांची मतदानासाठी गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. त्यानंतर मात्र सर्वच मतदानकेंद्रांवर मतदारांची गर्दी वाढू लागली होती. आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला अधिकाधिक मते मिळवण्याकरिता कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असतानाच मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार स्वेच्छेने आणि मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडताना दिसत होते. मतदान केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय अधिक लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी गस्त घालताना दिसून येत होते. २७६ होमगार्ड, ८० आरपीसी जवान, स्टॅटिक फोर्सचे १६० जवान तसेच ६ स्ट्रायकिंग फोर्स, जिल्ह्यातील नियमित ७५४ पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताकरिता साहाय्य करीत होते. तर मतदान प्रक्रियेसाठी महसूल विभागाच्या ९८ अधिकाºयांसह ७५३ अधिकारी तैनात करण्यात आले होते.सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. कोणत्याही मतदान केंद्रावर अनूचित घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली.सोमवारी होणाºया मतमोजणीकरितादेखील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीकरिता सकाळीच बंदोबस्त तैनात करण्यात येणारआहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRaigadरायगड