अलिबाग : रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. अलिबाग तालुक्यातील दिवलांग गावातील रघुनाथ म्हात्रे आणि त्याचा मुलगा हृषिकेश म्हात्रे याच्या अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील हे सोमवारी १ ऑक्टोंबर रोजी म्हात्रे कुटुंबियांच्या घरी जाऊन पत्नी आणि मुलाची सात्वनपर भेट घेतली.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील किनारी भागात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट सायंकाळी सुरू झाला होता. दिवलांग गावातील पिता पुत्र हे आपल्या शेत तळ्यावर गेले होते. त्याचवेळी दोघांच्या अंगावर विज पडून त्यात जखमी झाले. ही घटना कळताच स्थानिकांनी आणि कुटुंबांनी त्वरित दोघांना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता दोघानाही मयत घोषित करण्यात आले.
म्हात्रे पिता पुत्राचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सपूर्द करण्यात आला. सोमवारी म्हात्रे पिता पुत्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील यांनी दिवलांग येथे म्हात्रे याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सात्वन केले.