शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

इंजिनियरिंगचे स्वप्न पूर्ण करायला वडिलांसह गेला अन्...

By admin | Published: August 04, 2016 1:15 AM

मुलाने बारावीचे शिक्षण सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले

सावर्डे : महाड येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या एका एस. टी.चे चालक सावर्डे येथील श्रीकांत शामराव कांबळे (५५) हे होते. सोबत त्यांचा मुलगा महेंद्र श्रीकांत कांबळे (१९) होता. मुलगा आपल्या वडिलांसोबत बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी मुंबई येथील माटुंगा व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी निघाला होता.मूळचे मिणचेसावर्डे (ता. हातकणंगले) येथील कांबळे कुटुंबीय काही वर्षांपूर्वी आपल्या सरकारी नोकरीनिमित्ताने चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीसलाईन येथे स्थायिक झाले होते. ते मूळचे कोल्हापूर, तालुका हातकणंगलेमधील मीनसे सावर्डेचे रहिवासी होते. मुलाने बारावीचे शिक्षण सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले. चालक श्रीकांत शामराव कांबळे हे पत्नी सावित्री श्रीकांत कांबळे व दोन मुलांसह सावर्डे येथे राहात होते. मीलन कांबळे (२२) हा रत्नागिरीमध्ये फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करून सध्या नोकरीच्या शोधात होता. लहान मुलगा महेंद्र याने बारावीपर्यंतचे शिक्षण सावर्डे महाविद्यालयात पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्याने सावर्डे येथून काही दिवसांपूर्वी आॅनलाईन प्रवेशाद्वारे मुंबई - माटुंगा येथील व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालय निवडले होते. याच प्रवेश प्रकियेची फेरी बुधवारी होती. वडील चिपळूण बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत होते. बोरिवली - चिपळूण या गाडीवर बहुतांशवेळा ते सेवेत असायचे. मंगळवारी राजापूर - बोरिवली गाडीवर चालक म्हणून चिपळूण आगारातून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांचा मुलगा त्याच गाडीतून प्रवास करीत होता, ते चालक म्हणून होते तर मुलगा त्यांच्या शेजारीच बसून प्रवास करीत होता. महाड येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या बससोबत तोही बेपत्ता झाला आहे. (वार्ताहर)