- शरद निकुंभ पाली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा खूश झाला असून, ग्रामीण भागात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या वडिलांची धावपळ सुरू असताना तरुण पोरं मात्र मोबाइल हातात धरून तासन्तास फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि मनोरंजन करण्यात गुंग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. गुड मॉर्निंग, गुड नाइटचे संदेश, दिवसभरात वाढदिवसांच्या शुभेच्छा, टीकात्मक लेख, टिकटॉकच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी वडिलांना शेतीच्या कामात मदत गेल्यास मजुरांवर होणारा खर्च वाचेल, शिवाय उत्पादनातही वाढ होईल, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील चिंतातून बळीराजाकडून व्यक्त होत आहे.सध्या शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, त्यामुळे अधिक मजुरी द्यावी लागत आहे. अशा स्थितीत घरातील तरुण पोरगा मात्र आपल्या वडिलांना शेतात हातभार लावायचा सोडून निरर्थक कामात आपला वेळ वाया घालवत आहे. शेतातील कामाची आजच्या तरुणांना लाज वाटत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांत पाहायला मिळत आहे. मदर डे आणि फादर डे च्या शुभेच्छा फक्त मोबाइलवर देऊन कृती मात्र शून्य असते. आईवडिलांची घरकामात, शेतीच्या कामात मदत करण्यापेक्षा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविण्यात ही पिढी धन्यता मानत आहे.आजचा तरुणवर्ग मोबाइलच्या फेºयात गुरफटला आहे. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करायला तयार नाही. शेतकरी असून शेतीच्या कामांची त्याला पुरेशी माहिती नाही. पुढील पिढी शेतीचे काम करेल, असा प्रश्न पालकांना पडतो. शिक्षणाबरोबरच शेतीचे शिक्षणही तरुण पिढीने घेणे, काळाची गरज आहे.- किसन उमटे,शेतकरी, कानसळवडिलांनी शेती तरुण पिढीने टिकवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर तासन्तास वेळ वाया घालविण्यात धन्यता मानणारी ही पिढी वडिलांच्या कष्टाला कशी न्याय देणार? शिक्षण झाले तरी नोकरी नाही आणि शेतीचे काम येत नाही तर पुढे ही मंडळी काय करणार असा प्रश्न आहे?- राजेश गोळे,सामाजिक कार्यकर्ते, पेडली
Fathers Day: बाप राबतोय शेतात अन् अॅन्ड्रॉइड फोन पोरांच्या हातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:50 AM