फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:54 PM2019-02-22T23:54:06+5:302019-02-22T23:54:23+5:30

सैनिक संघटनेचे निवेदन : जिल्हाधिकारी देणार कार्यवाहीचे आदेश

Fauji departs from Amvade village facilities | फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

Next

अलिबाग : भारत देशाच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने जवान देणाऱ्या महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावामध्ये सुविधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने गावातील विकासाकडे लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना दिले. समस्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश देऊन पुढील सात दिवसांत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

फौजी आंबवडे या गावाला सुमारे २५० वर्षांपासून सैनिक कुटुंबांची परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळापासून या गावातील नागरिक सैनिकी सेवेत आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये याच गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यातील सहा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश राजवटीत गावात स्मारक उभारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धामध्ये तब्बल ३५० सैनिकांचा सहभाग होता. १९६५ च्या युद्धामध्येही गावातील सैनिकांनी दुष्मन सैन्याशी दोन हात केले होते. त्यामध्ये सुभेदार रघुनाथ कदम हे शहीद झाले होते. त्यानंतर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ४०० सैनिकांनी सहभाग घेत अतुलनीय पराक्रम केला होता. नायक मनोहर पवार यांना सेवा मेडल प्रदान करण्यात आले होते.
तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांच्या शिफारशीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या गावाल भेट देऊन फौजी आंबवडे हे नाव दिले होते. गावातील सैनिकांनी देशाची सेवा केली आहे आणि आजही करत आहेत; परंतु हेच गाव विकासापासून वंचित राहिले आहे. गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा असून नसल्या सारख्याच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस, बाळाराम पवार, प्रभाकर जाधव, गंगाराम पवार आदी उपस्थित होते.

या सुविधांची गावाला आहे गरज
च्महाड-फौजी आंबवडे रस्ता अपूर्ण आहे. रस्त्याचे डांबरीकरण सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले आहे, त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असल्याने रस्त्याचे तातडीने काम होणे गरजेचे आहे.
च्पोलादपूर तालुक्याला जोडणार रस्ता २० वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. त्याचेही काम अर्धवट आहे. या रस्त्याचे काम झाल्यास फौजी आंबवडे, शिरवली, पांगारी, विन्हेरे, रावतळी, फाळकेवाडी, ताम्हाणे, कावळे कुंभर्डे, गवाडी ही गावे पोलादपूर तालुक्याच्या संपर्कात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावात एकूण २३ वाड्या आहेत त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत रस्ते आणि साकव (पूल) बांधणे गरजेचे आहे.

1गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खिंडवाडी ते अहिरेवाडी, मधला कोंड ते चिंचेची वाडी आणि सावळेवाडी अशा तीन योजना आहेत. पाइपलाइन खराब झाली आहे, तसेच धरणातून थेट पाणी येत असल्याने ते पिण्यालायक नसते, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.
2गावातील शहीद स्मारकांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण रायगड जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. त्याचे कामही अर्धवट स्थितीच आहे. त्याचप्रमाणे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

आरोग्य सुविधा नाही
च्गावामध्ये उपआरोग्य केंद्र आहे; परंतु सातत्याने मागणी करूनही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्ध माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, लहान मुले यांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा प्राप्त होत नाहीत. गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Fauji departs from Amvade village facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड