शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कर्जत येथील बाजारपेठेला फेरीवाल्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:45 PM

टोइंग व्हॅन बंद : पाच वेळा निविदा काढूनही प्रतिसाद नाही

कर्जत : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुंद केलेले रस्ते कुणासाठी बांधलेत हासुद्धा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा बसला आहे. वारेमाप रिक्षा परवाने देणे सुरू असल्याने रस्ते कमी आणि रिक्षा जास्त असे झाले आहे. त्यातच जागा असेल तेथे रिक्षा लावण्याची प्रवृत्ती या साऱ्या प्रकारामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसते. त्यातच सकाळच्या वेळी चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना तसेच प्रवाशांना गाड्या पकडण्यासाठी कसरत करावी लागते. मात्र रात्री बाजारपेठेतील रस्ता मोठा दिसतो आणि दिवस उजाडला की रस्ता भरगच्च असतो.

मध्यंतरी टोइंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्याप्रकारे सुटू लागला. कराराची मुदत संपली आणि टोइंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.कर्जतची वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी होऊन बसली आहे. पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी आल्यानंतर किंवा नगर परिषदेची सूत्रे नवीन मुख्याधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर काही दिवस कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली राहते. मात्र, नंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होऊन बसते. आता नवीन मुख्याधिकारी आले परंतु त्यात काहीच बदल झाला नाही. मध्यंतरी टोइंग व्हॅनची तांत्रिक अडचण सोडवून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या उपक्रमाचे स्वागत कर्जतकरांनी केले होते. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांनी सुस्कारा सोडला होता.

काही महिन्यांनी टोइंग व्हॅन बंद झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी याबाबत सरकारी पोर्टलद्वारे माहिती विचारल्यावर नवीन आलेले मुख्याधिकारी पंकज पवार - पाटील यांनी ‘पोलीस खात्याच्या सहकार्याने टोइंग व्हॅन ठेकेदाराची एक वर्षासाठी नियुक्ती केली होती. नेमणुकीची मुदत संपल्यानंतर ठेकेदाराने काम बंद केले. पाच वेळा निविदा काढूनसुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने टोइंग व्हॅन बंद करावी लागली आहे,’ असे लेखी कळवून या कामासाठी पुन्हा निविदा प्रसिद्ध करून ठेकेदाराची नेमणुकीची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.