उरण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 12:51 AM2021-03-24T00:51:20+5:302021-03-24T00:51:50+5:30

भाजप संबंधित असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेेकेदाराकडे मागील पाच वर्षांपासून १२ लाखांची थकबाकी आहे

Fight between Shiv Sena-BJP members at Uran Municipal Council general meeting | उरण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये हाणामारी 

उरण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप सदस्यांमध्ये हाणामारी 

Next

उरण : उरण नगर परिषदेच्या मंगळवारी (२३) रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर नगराध्यक्ष आणि भाजपच्या काही सदस्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी सेना नगरसेवकांना उर्मटपणे उत्तरे दिली. त्यामुळे सेना-भाजप सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक, शिवीगाळीवरून प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचल्याने सभागृहात चांगलाच गदारोळ माजला.

उरण नगर परिषदेने मंगळवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. उनपच्या कामकाजात विषय क्रमांक ११ मध्ये जुने फूलमार्केट पाडून नवीन फूलमार्केटचे काम सुरू करण्यात येणार आहे. फूलविक्रेत्यांसाठी सध्या तात्पुरती पत्र्याची शेड उभारण्यासाठी भाजपच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी सुमारे सहा लाख २१ हजार ४०० रुपये खर्चाचे काम रीतसर निविदा न मागविता करण्यात आले आहे. नगराध्यक्षांनी गैरप्रकार करण्यासाठीच स्वत:चे अधिकार वापरून केेेलेल्या कामाबद्दल सेना सदस्य अतुुल ठाकूर यांनी सभागृहात आक्षेप घेत जाब विचारला. यामुळे चिडलेल्या सायली म्हात्रे सदस्यांना समाधानकारक उत्तर न देता पीठासन सोडून उतरल्या. सेना सदस्य अतुुल ठाकूर यांच्या हातातून माईक हिसकावून घेतला. इतक्यावरच न थांबता सभागृहातून चालते व्हा. तुम्हाला काय करायचे ते करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आव्हान दिले. 

तसेच उनपने मालमत्ता कराच्या थकीत रकमेच्या सक्तीच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. मात्र भाजप संबंधित असलेल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ठेेकेदाराकडे मागील पाच वर्षांपासून १२ लाखांची थकबाकी आहे. सामान्यांकडून मालमत्ता कर वसुुुलीसाठी सक्ती केली जात असताना कॉम्प्लेक्सच्या ठेकेदाराला सवलत का तसेच शहरातील पाणीटंचाई, पाणीपुरवठ्यावरही सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. सेनेच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा, उत्तरे देण्याऐवजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी यांच्यासह अन्य भाजपच्या सदस्यांनी सेना सदस्यांना शिवीगाळ केली आणि सभागृहात गदारोळ माजला.

सभागृहात नगराध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतरच प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र सेनेचे सदस्य परवानगी न घेताच मध्येच प्रश्न उपस्थित करीत होते. शिवाय सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर प्रश्न उपस्थित न करता भलतेच प्रश्न उपस्थित करीत होते. सभागृहात कसे वागावे याची माहिती देताना सेना सदस्य उगीचच आक्रमक झाले होते. याला अटकाव करण्याच्या प्रयत्नात शाब्दिक चकमक उडाली. या चकमकीत सभागृहात माईकचा दुरुपयोग होऊ नये त्यामुळे सदस्यांच्या हातातून माईक काढून घ्यावा लागला. शिवीगाळ, हाणामारी असले प्रकार घडले नाहीत. - सायली म्हात्रे, नगराध्यक्षा

सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचे आणि सदस्यांना समाधानकारक उत्तर देण्याचे अधिकार संविधानमध्ये देण्यात आले आहेत. मात्र नगराध्यक्षांना सभागृह आणि प्रशासन चालविण्याचा अनुभव नाही. नगराध्यक्षांच्या आजच्या बालिश वर्तनामुळे त्यांनी सभागृहाची प्रतिमा मलिन केली. - गणेश शिंदे, गटनेते

 

Web Title: Fight between Shiv Sena-BJP members at Uran Municipal Council general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.