अलिबाग : कोविड १९ रुग्णांमध्ये व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमध्ये होत असलेली वाढ विचारात घेता, यापुढे कोविड १९ नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून करण्यासाठी राज्यभर १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर, २०२० या कालावधीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या विरोधातील ही लढाई आपण सर्व मिळून सक्षमपणे लढू या, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले.‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबर, तर दुसरी फेरी १४ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत गृहभेटीद्वारे संशयित कोविड तपासणी व उपचार करणे, अतिजोखमीच्या व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देणे, रुग्णांच्या भेटीद्वारे सर्वेक्षण करणे, त्यांची तपासणी आणि उपचार, तसेच गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरिकाला कोविड १९ बाबत आरोग्य शिक्षण देणे हे मोहिमेची उद्दिष्टे आहेत.१४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन ही मोहीम प्रभावीरीत्या राबविण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावरील अधिकाºयांसमवेत बैठक घेऊन ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या केल्या.१५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर कालावधीत मोहीमही मोहीम रायगड जिल्ह्यामध्ये १५ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी १ हजार ५०० पथके तयार करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी गृहभेटीच्या वेळी येणाºया सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करून, त्यांच्या घरातील सदस्यांची आरोग्य विषयक खरी माहिती द्यावी व आपली आरोग्यविषयक तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:17 PM