आरोग्य विभागात सक्शन व्हॅन दाखल; स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील रकमेतून खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:02 AM2020-01-13T00:02:23+5:302020-01-13T00:02:25+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटीचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे.

Filed a suction van in the health department; Expenditure from the grant amount received under Swachh Bharat Abhiyan | आरोग्य विभागात सक्शन व्हॅन दाखल; स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील रकमेतून खर्च

आरोग्य विभागात सक्शन व्हॅन दाखल; स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील रकमेतून खर्च

Next

कर्जत : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील गाड्याच्या ताफ्यात आणखी एका वाहनाची भर पडली आहे. आता सक्शन व्हॅनचा यात समावेश करण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटीचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिल्या अडीच कोटी रुपयांच्या अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि नळपाणी योजना यावर निधी खर्च केला जाणार आहे. या निधीतून नगरपरिषदेने चार महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर खरेदी केला होता. आता ट्रॅक्टरला जोडले जाईल, असे सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सक्शन मशिन खरेदी करून आरोग्य सेवेत दाखल करण्यात करण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती संचिता पाटील, महिला बाल कल्याण सभापती विशाखा जिनगरे, मागासवर्गीय कल्याण सभापती वैशाली मोरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, भारती पालकर, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे उपस्थित होते.
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ट्रॅक्टर आणि सक्शन मशिन हे वेगवेगळे खरेदी करण्यामागे नियोजन सांगितले. जेव्हा सक्शन मशिनचे काम नसेल त्या वेळी हा ट्रॅक्टर नगरपरिषद हद्दीतील कचरा संकलनाचे काम करेल. या वेळी स्थापत्य अभियंता नीलेश चौडीए, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, सुनील लाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, नगरपरिषद कर्मचारी दिनेश हिरे, कुमार परदेशी, सुनील सुर्वे, बाळकृष्ण बनसोडे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Filed a suction van in the health department; Expenditure from the grant amount received under Swachh Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.