शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आरोग्य विभागात सक्शन व्हॅन दाखल; स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील रकमेतून खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:02 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटीचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे.

कर्जत : नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील गाड्याच्या ताफ्यात आणखी एका वाहनाची भर पडली आहे. आता सक्शन व्हॅनचा यात समावेश करण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटीचे प्रोत्साहन पर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिल्या अडीच कोटी रुपयांच्या अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि नळपाणी योजना यावर निधी खर्च केला जाणार आहे. या निधीतून नगरपरिषदेने चार महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर खरेदी केला होता. आता ट्रॅक्टरला जोडले जाईल, असे सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी ४ लाख ६० हजार रुपये किमतीचे सक्शन मशिन खरेदी करून आरोग्य सेवेत दाखल करण्यात करण्यात आली.

याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती संचिता पाटील, महिला बाल कल्याण सभापती विशाखा जिनगरे, मागासवर्गीय कल्याण सभापती वैशाली मोरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, भारती पालकर, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे उपस्थित होते.मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून ट्रॅक्टर आणि सक्शन मशिन हे वेगवेगळे खरेदी करण्यामागे नियोजन सांगितले. जेव्हा सक्शन मशिनचे काम नसेल त्या वेळी हा ट्रॅक्टर नगरपरिषद हद्दीतील कचरा संकलनाचे काम करेल. या वेळी स्थापत्य अभियंता नीलेश चौडीए, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, सुनील लाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, नगरपरिषद कर्मचारी दिनेश हिरे, कुमार परदेशी, सुनील सुर्वे, बाळकृष्ण बनसोडे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.