महाड : महाड बिरवाडी आणि गोरेगाव येथील गुंतवणूकदारांना सुमारे पाच कोटींंहून अधिक रकमेला चुना लावुन गाशा गुंडाळणाऱ्या आॅस्कर मॅनेजमेंट सर्व्हिसेस या गुंतवणूक कंपनीच्या व्यवस्थापकांच्या विरोधात या कंपनीच्या एका महिला एजंटने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.गेल्या तीन वर्षांपासून महाड शहरासह बिरवाडी व गोरेगाव या ठिकाणी या गुंतवणूक कंपनीच्या शाखा कार्यरत होत्या. या कंपनीने नेमलेल्या एजंट्सद्वारे सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांनी या कंपनीत पिग्नी खात्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र मूळच्या ओरिसा राज्यातील या गुंतवणूक कंपनीने अचानक या शाखा बंद करून आपला गाशा गुंडाळल्याने गुंतवणूकदारांसह एजंट्सदेखील अडचणीत सापडले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील महाड ट्रेड सेंटर या इमारतीतील आॅस्कर मॅनेजमेंटची शाखा बंद असून गुंतवणूकदारांनी एजंट्स आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी तगादा लावला आहे. आॅस्करची महाड शाखा बंद करून त्याच जागेत पंचवटी मल्टीस्टेट को-आॅ. क्रेडिट सोसायटी या दुसऱ्या नवीन गुंतवणूक कंपनीची शाखा चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली असून, आता तीही शाखा बंद असल्याचे दिसते आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात आॅस्करच्या एजंट प्रभाती गोपीनाथ स्वाई यांनी बिरवाडी शाखेचे व्यवस्थापक दिनेश दौलत पवार, महाड शाखा व्यवस्थापक संपत धोंडू झांजे व झोनल अकाउंटंट विनोद पवार या तिघांविरोधात दमदाटीची तक्रार केली असून, पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या कंपनीची शाखागेल्या काही दिवसांपासून शहरातील महाड ट्रेड सेंटर या इमारतीतील आॅस्कर मॅनेजमेंटची शाखा बंद आहे. गुंतवणूकदारांनी एजंट्स आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे ठेवी परत मिळण्यासाठी तगादा लावला आहे. आॅस्करची महाड शाखा बंद करून त्याच जागेत पंचवटी मल्टीस्टेट को-आॅ. क्रेडिट सोसायटी या दुसऱ्या नवीन गुंतवणूक कंपनीची शाखा चार महिन्यांपूर्वी सुरू केली आहे.
ठेवीदारांना फसवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2015 12:23 AM