कर्जत : नगरपरिषदेची निवडणूक २७ जानेवारी २०१९ रोजी जाहीर झाली असून, ९ जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ११४ नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती. गुरुवार, १० जानेवारी रोजी छाननीत ५५ नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत, तर ५९ नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिली.
९ जानेवारी रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्या दिवसापर्यंत विविध पक्षांच्या उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. गुरुवारी सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी सुरू झाली. नगराध्यक्षपदासाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल झाली होती, त्यामध्ये दोन नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत, तर चार नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत.