शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
2
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
3
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
4
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
5
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
6
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
7
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
8
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
9
राज ठाकरेंचं पुत्र अमित ठाकरेंसाठी उद्धव ठाकरे गट माहिम मतदारसंघ सोडणार?
10
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
11
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग
12
Sharad Pawar News सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
13
"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा
14
Manappuram Finance Shares: RBI च्या कारवाईनंतर 'या' शेअरमध्ये हाहाकार, गुंतवणूकदारांकडून विक्री; ₹१४७ वर आला भाव, एक्सपर्ट म्हणाले...
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा
16
शोएब अख्तरचा अंदाज ठरला खोटा; इंग्लंड विरुद्ध पाक संघानं विजय मिळवला मोठा
17
Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रोहित पाटील यांच्याविरोधात अजितदादांची खेळी? संजयकाकांनी घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण
19
“तिढा सोडवण्यास राज्यातील काँग्रेस नेते सक्षम नाहीत, राहुल गांधींशी चर्चा करणार”: संजय राऊत
20
नरेंद्र भोंडेकर मुख्यमंत्र्यांची साथ सोडणार? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

उरणच्या आणखी दोन पाणथळ क्षेत्रांवर भराव : पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 8:08 PM

सिडको, जेएनपीएच्या १२.५% योजनेच्या अंतर्गत  प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यासाठी भराव टाकण्यात येत आहे.

मधुकर ठाकूर

उरण : दास्तान फाटा आणि सावरखार पाणथळ क्षेत्रांवर घातलेल्या मोठ्या प्रमाणातील भरावांमुळे उरणमधल्या काही गावांना पूर येण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती पर्यावरणवाद्यांनी याआधीच वर्तवली आहे.मात्र त्यानंतरही जेएनपीएद्वारे मातीचे भराव घालणे, आंतरभरतीच्या जलप्रवाहाला थांबविणे, निम्न स्तरीय असलेल्या क्षेत्रांना आणखीन धसवण्याचे काम सुरूच आहे.आता जासई-दास्तानफाटा ते करळपासून ३.६ किमी अंतरापर्यंत असलेली खाडीही  बुजवण्यातच येत असल्याने उरण-पनवेलला जोडणा-या एनएच- ३४८ रस्त्याच्या किमान पाच फुट उंचीवर गेला असल्याने पुराचा धोका आणखी वाढला असल्याची तक्रार सागरशक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सिडको, जेएनपीएच्या १२.५% योजनेच्या अंतर्गत  प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्यासाठी भराव टाकण्यात येत आहे.प्रकल्पग्रस्तांना भुखंड स्वरुपात भरपाई आवश्यक आहे, पण जेएनपीए आणि सिडकोने खाडीच्या पाण्यावर नवीन भराव घालण्याऐवजी आधीपासून विकसीत केलेले भाग निवडायला हवे होते असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.मात्र आंतरभरती प्रवाहाला संपूर्णपणे थांबवल्यामुळे आता जासई, दास्तान, बेलपाडा, करळ, जसखार, सोनारी आणि सावरखारसारख्या गावांमध्ये पूर येण्याची शक्यता पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केली जात आहे. याआधीही अविवेकी भरावामुळे उरणच्या अनेक भागांमध्ये तसेच भातशेतीमध्ये समुद्राचे पाणी शिरले होते.जेएनपीटी कंटेनर बंदर तसेच जेएनपीए सेझला जोडणारा उरण-पनवेल मार्ग(एनएच ३४८)  भरती उच्च प्रमाणात झाल्यास धोक्यात येऊ शकतो. भरावापासून अरबी समुद्र अगदी हाकेच्या अंतरावर आहे.कोणतीही तमा न बाळगता घातलेल्या भरावामुळे सावरखार पाणथळ क्षेत्रही पूर्णपणे शुष्क झाले आहे. ही बाब गावांसाठी दुहेरी समस्या निर्माण करणारी आहे.या प्रकरणी तक्रारींनंतर महसूल अधिका-यांनी डिसेंबर २०२१मध्ये भराव घालण्यावर काही काळ निर्बंध आणला होता. परंतु २२ हेक्टरमध्ये पसरलेला जलस्त्रोत पाणथळ क्षेत्र नसण्याच्या जेएनपीएच्या दाव्यापुढे महसूल अधिकारी देखील हतबल झाले असल्याचा आरोप नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार व वनशक्ती एनजीओची समुद्री शाखा सागरशक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पाणथळ क्षेत्र समितीला पर्यावरणवाद्यांनी तक्रार केल्यामुळे २०१९ नंतर डेब्रिजचा भराव घालणे थांबले होते. “या व्यतिरिक्त आसपासच्या डोंगरांमधून खणलेल्या मातीला आणण्यासाठी आवश्यक असलेले रॉयल्टी परवाने कंत्राटदारांकडे नव्हते.  स्थळांची पाहणी झाल्यानंतर ही गंभीर बाब निदर्शनास आली होती.

दास्तान फाटा येथील सुमारे ४०० हेक्टर्सपेक्षा  जास्त भागात पसरलेले आंतरभरती जलक्षेत्र पाणथळ स्थळ नसल्याच्या सिडको व जेएनपीएने केलेल्या दाव्यावर पर्यावरण विभागाने किंवा पाणथळ समितीने कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही ही अतिशय दु:खद बाब असल्याचेही पवार व कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको