अखेर खोपोलीतील प्रज्ञानगर उजळले

By admin | Published: December 13, 2015 12:15 AM2015-12-13T00:15:51+5:302015-12-13T00:15:51+5:30

मुंबई - पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीजवळ असूनही येथील प्रज्ञानगर वसाहत आजतागायत अंधारात होती. मात्र नगरसेवक किशारे पानसरे यांच्या प्रयत्नामुळे अखेर

Finally, the Progyanagala of the Khopoli was shining | अखेर खोपोलीतील प्रज्ञानगर उजळले

अखेर खोपोलीतील प्रज्ञानगर उजळले

Next

खालापूर : मुंबई - पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीजवळ असूनही येथील प्रज्ञानगर वसाहत आजतागायत अंधारात होती. मात्र नगरसेवक किशारे पानसरे यांच्या प्रयत्नामुळे अखेर ही वसाहत प्रकाशमय झाली आहे.
सुमारे २० घरांची वस्ती असलेल्या प्रज्ञानगरमध्ये विजेचे मीटर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे इतकी वर्षे अंधाराचा सामना केल्यानंतर प्रकाशमय झालेल्या प्रज्ञानगर रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखानदारी असल्याने खोपोलीला वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. शहरातील अनेक भागांत गृहसंकुलांची कामे सुरू असून, अनेक इमारतीही उभ्या आहेत. पालिका हद्दीतील अनेक वसाहतींमध्ये अद्याप मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीत. रेल्वे स्थानकालगत असलेल्या प्रज्ञानगरची अवस्थाही अशीच आहे. वसाहतीमध्ये साधी विजेची सोय नव्हती. त्यामुळे नगरसेवक किशोर पानसरे यांनी पुढाकार घेत बुद्धविहारात विजेचा मीटर बसवून दिला आहे. या मीटरवरूनच वसाहतीमधील प्रत्येक घरात जोडणी देण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Finally, the Progyanagala of the Khopoli was shining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.