अखेर सिंहगडमधील महिलांची बोगी बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:47 AM2018-05-05T06:47:24+5:302018-05-05T06:47:24+5:30
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांना गेल्या काही महिन्यांपासून अर्ध्या डब्यामधूनच प्रवास करावा लागायचा. जागेअभावी अनेक महिला प्रवाशांना खाली बसून प्रवास करायला लागत होता. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने त्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सिंहगडच्या महिला प्रवाशांसाठी नवीन डबा लावण्यात आला आहे.
कर्जत - मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमधील महिला प्रवाशांना गेल्या काही महिन्यांपासून अर्ध्या डब्यामधूनच प्रवास करावा लागायचा. जागेअभावी अनेक महिला प्रवाशांना खाली बसून प्रवास करायला लागत होता. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने त्याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर सिंहगडच्या महिला प्रवाशांसाठी नवीन डबा लावण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११0१0) या गाडीचा महिलांचा आरक्षित डबा रेल्वे प्रशासनाने बदलून छोटी कट बोगी असलेला डबा लावला होता. त्यामुळे पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची गैरसोय होत होती. अनेक महिला प्रवाशांना डब्यात खाली बसून अवघडलेल्या अवस्थेत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करणाºया महिला प्रवाशांनी मुंबई येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना लेखी विनंती अर्ज करून डबा बदलून देण्याची विनंती केली होती; परंतु रेल्वे प्रशासनाकडून महिलांच्या विनंती अर्जावर कोणताही विचार झाला नव्हता. सदर महिला प्रवाशांनी सदरील बाब कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांना सिंहगड एक्स्प्रेसचा डबा बदलून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. गंगावणे यांनी तत्काळ पुणे व मुंबई येथील रेल्वे विभागीय व्यवस्थापक तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी संपर्क करून सिंहगड एक्स्प्रेसमधील महिलांचा डबा बदलून द्यावा व महिला प्रवाशांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत, रेल्वे प्रशासनाकडून दुसºयाच दिवशी सिंहगड एक्स्प्रेसमधील महिलांचा डबा बदलला गेला. त्यामुळे पुणे-मुंबई दैनंदिन प्रवास करणाºया महिला प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे व डबा बदलून मिळावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे प्रभाकर गंगावणे यांचे आभार
मानले.